एक्स्प्लोर
Happy Birthday Tiger Shroff : वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात टायगरबद्दलच्या खास गोष्टी...
,Tiger Shroff
1/8

Happy Birthday Tiger Shroff : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff ) चा आज 32 वा वाढदिवस आहे.(photo:tigerjackieshroff/ig)
2/8

टायगर श्रॉफचा जन्म 2 मार्च 1990 रोजी झाला. त्याचे वडील जॅकी श्रॉफ हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते आहेत. फार कमी लोकांना माहित आहे की टायगरचे खरे नाव हेमंत श्रॉफ असं आहे. (photo:tigerjackieshroff/ig)
3/8

टायगर लहान होता तेव्हा त्याच्या वडीलांनी त्याचं टोपण नाव टायगर असं ठेवलं. बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी टायगरनं त्याचं नाव बदललं. (photo:tigerjackieshroff/ig)
4/8

2014 मध्ये प्रदर्शित झालेल्या हिरोपंती या चित्रपटामधून त्यानं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यावेळी टायगरच्या फिटनेसनं अनेकांचे लक्ष वेधलं पण काहींनी त्याच्या लूकला ट्रोल केलं. (photo:tigerjackieshroff/ig)
5/8

अनेकांनी त्याला गर्ल लूक आणि पिंक लिप्स लूक असं म्हणत ट्रोल केले होते. पण टायगरनं या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष केलं. (photo:tigerjackieshroff/ig)
6/8

टायगर हा तायक्वॉन्डोमध्ये ब्लॅक बेल्ट विनर आहे. तसेच त्यानं मार्शल आर्टचं देखील ट्रेनिंग घेतलं आहे. त्याच्या बाघी, वॉर, स्टूडंट ऑफ द इयर 2 या चित्रपटांमधील टायगरच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. (photo:tigerjackieshroff/ig)
7/8

अनेक वेळा टायगरचे नाव अभिनेत्री दिशा पाटणीसोबत जोडले जाते. पण टायगरनं त्याच्या आणि दिशाच्या नात्याबद्दल कोणतीही माहिती त्याच्या चाहत्यांना दिलेली नाही. (photo:tigerjackieshroff/ig)
8/8

लवकरच टायगरचे हिरोपंती, गणपत आणि बडे मिया छोटो मिया हे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. (photo:tigerjackieshroff/ig)
Published at : 02 Mar 2022 11:21 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























