एक्स्प्लोर
ग्लॅमर, ग्रेस आणि अटिट्युड... एकाच लुकमध्ये पाहायचंय? मग बघा अमृता खानविलकरचा हा स्टायलिश अवतार!
अमृता खानविलकर म्हणजे सौंदर्य आणि आत्मविश्वासाचं परफेक्ट कॉम्बिनेशन!
अमृता खानविलकर
1/9

मराठी चित्रपटसृष्टीतील नावाजलेली अभिनेत्री अमृता खानविलकर ही अभिनयात जितकी ताकदवान आहे, तितकीच ती तिच्या नृत्यकौशल्यासाठी आणि स्टाईलसाठीही ओळखली जाते.
2/9

ती फक्त एक अभिनेत्री नाही, तर एक अष्टपैलू कलाकार आहे जी मराठी आणि हिंदी दोन्ही इंडस्ट्रीमध्ये आपल्या कलेची छाप सोडते.
3/9

अमृताची कारकीर्द सुरू झाली २००४ साली 'इंडियाज बेस्ट सिनेस्टार्स की खोज' या टॅलेंट शोमधून.
4/9

या मंचावरूनच तिला हिंदी टेलिव्हिजन आणि नंतर मराठी सिनेमात काम करण्याची संधी मिळाली.
5/9

अमृता आणि हिमांशू यांची ओळख 'इंडियाज बेस्ट सिनेस्टार्स की खोज' या शोमध्ये झाली, २४ जानेवारी २०१५ रोजी दोघांनी विवाह केला
6/9

इंस्टाग्रामवर लाखो फॉलोअर्स असलेली अमृता तिच्या ग्लॅमरस फोटोशूट्स, व्हिडिओज, डान्स रील्स आणि सामाजिक मुद्द्यावरील मतांमुळे चर्चेत असते.
7/9

या लुकमध्ये अमृता खानविलकर एकदम ग्लॅमरस आणि रॉयल दिसते आहे.
8/9

तिच्या ड्रेसमधील मेटॅलिक थ्रीडी फ्लोरल डिझाइन गोल्ड, सिल्व्हर आणि ब्लॅकच्या कॉम्बिनेशनमध्ये अतिशय इनोवेटिव्ह आणि हाई-फॅशन वाटतो.
9/9

हा लुक अमृताच्या नेहमीच्या पारंपरिक लुकपेक्षा हटके असून, तिच्या एक्सपेरिमेंटल आणि ट्रेंडी फॅशन सेन्सला दाखवतो.
Published at : 14 Jul 2025 10:42 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
जॅाब माझा
व्यापार-उद्योग
नवी मुंबई
























