एक्स्प्लोर
Web Series 2021: यंदाच्या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येणार धमाकेदार वेब सीरिजचा नजराणा
1/8

विनय नांबियारची वेब सीरिज 'तैश'ही रिलीज होण्यासाठी सज्ज आहे.
2/8

कोरोनाच्या महामारीमुळं अनेक क्षेत्रांवर याचे थेट परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले. कवाविश्वही याला अपवाद ठरलं नाही. जिथं चित्रपटगृहांमध्ये चित्रपटांचं प्रदर्शन बंद झालं होतं, अनेक चित्रपटाच्यांच्या प्रदर्शनाची तारीखही पुढे गेली आणि काहींनी ओटीटी प्लॅटफॉर्मवरच चित्रपट प्रदर्शनाला प्राधान्य दिलं, तिथं वेब सीरिज विश्वानं प्रेक्षकांना नाराज केलं नाही. 2021 हे वर्षही वेब विश्वातून प्रेक्षकांसाठी एक नजराणा सादर केला जाणार आहे.
3/8

झी-5 ओरिजिनलवर अमित सधची मुख्य भूमिका असणाऱ्या 'जिद' या सीरिजनं प्रेक्षकांच्या यादीत आणखी एक पर्याय उपलब्ध होणार आहे.
4/8

तर, नेटफ्लिक्सवर यंदाच्या वर्षी 'बॉम्बे बेगम्स' ही सीरिज प्रेक्षकांना पाहता येणार आहे.
5/8

वरील सीरिजव्यतिरिक्त अॅमेझॉन प्राईमवर 'मुंबई डायरीज 26/11' ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
6/8

असूर 2- वूट सिलेक्ट या प्लॅटर्मवर प्रदर्शित होणाऱ्या असूर 2 या वेब सीरिजमध्ये अभिनेता अर्शद वारसी फॉरेंसिक विशेषज्ज्ञांच्या भूमिकेत दिसेल. या सीरिजच्या पहिल्या पर्वाचीही बरीच चर्चा झाली होती.
7/8

द फॅमिली मॅन- मनोज वायपेयीची मुख्य भूमिका असणाऱ्या या सीरिजचा दुसरा भाग 12जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सीरिजच्या निमित्तानं, दक्षिण भारतीय चित्रपट विश्वातील चेहरेही डिजिटल विश्वात पदार्पण करताना दिसणार आहेत.
8/8

तांडव - सैफ अली खान हा या वेब सीरिजमधील मुख्य आकर्षणाचा विषय. राजकीय नाट्यावर आधारलेल्या या वेब सीरिजमधून सत्तेच्या विश्वातील घडामोडी, उलथापालथ हे सारंकाही पाहता येणार आहे. अली अब्बास जफर आणि अभिनेत्री डिंपल कपाडिया या सीरिजच्या निमित्तानं डिजिटल विशअवात पदार्पण करत आहेत. 15 जानेवारीपासून अॅमेझॉन प्राईमवर ही सीरिज प्रदर्शित होणार आहे.
Published at :
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























