PHOTO: वाढदिवसानिमित्त जाणून घ्या डिस्को डान्सर मिथुन चक्रवर्तीबद्दलच्या खास गोष्टी!
Written By : abp majha web team | Updated at : 16 Jun 2022 11:39 AM (IST)
(photo:mithun_chakraborty_is_the_king/ig)
1/7
बॉलिवूड चित्रपटसृष्टीतील डिस्को डान्सर म्हणून प्रसिद्ध असलेले अभिनेते मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) आज (16 जून) आपला वाढदिवस साजरा करत आहे.(photo:mithun_chakraborty_is_the_king/ig)
2/7
मिथुन चक्रवर्ती यांचा जन्म 16 जून 1950 रोजी कलकत्ता येथे झाला. त्यांचे खरे नाव गौरांग चक्रवर्ती आहे. मिथुन चक्रवर्ती चित्रपट जगतात पाऊल ठेवण्यापूर्वी अभिनेत्री हेलन यांचे सहाय्यक होते. (photo:mithun_chakraborty_is_the_king/ig)
3/7
मिथुन चक्रवर्ती यांनी 1976 साली 'मृगया' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पहिल्याच चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला.(photo:mithun_chakraborty_is_the_king/ig)
4/7
मिथुन चक्रवर्ती यांनी अभिनय, अॅक्शन आणि नृत्य या तिन्हींमध्ये प्रभुत्व मिळवले आहे. त्यांनी बंगाली, हिंदी, ओरिया, भोजपुरी, तमिळ, तेलगू, कन्नड आणि पंजाबी अशा विविध भाषांमध्ये 350हून अधिक चित्रपट केले आहेत.(photo:mithun_chakraborty_is_the_king/ig)
5/7
अभिनय आणि नृत्यामुळे चर्चेत असणारे मिथुन चक्रवर्ती त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत होते.(photo:mithun_chakraborty_is_the_king/ig)
6/7
बॉलिवूडमध्ये अफेअर असणे आणि नंतर वेगळे होणे ही काही मोठी गोष्ट नाही. अशी अनेक उदाहरणे बी-टाऊनमध्ये पाहायला मिळतील. असंच काही मिथुन चक्रवर्तींबाबतही घडलं होतं. या दरम्यान मिथुन चक्रवर्ती श्रीदेवीच्या प्रेमात पडले होते. इतकंच नाही, तर दोघांनी गुपचूप लग्नही केल्याच्या बातम्या आल्या होत्या. डान्सर-अभिनेते मिथुन चक्रवर्ती आणि श्री देवी एकमेकांच्या खूप जवळ आले होते. मिथुन यांनी आपल्या पत्नीला घटस्फोट देऊन त्यांच्याशी लग्न करावे, अशी श्रीदेवींची इच्छा होती. या दम्यान दोघांनी मंदिरात लपून लग्न केल्याचेही बोलले जात होते.(photo:mithun_chakraborty_is_the_king/ig)
7/7
मिथुन चक्रवर्ती यांना देखील श्रीदेवीशी लग्न करायचे होते. श्रीदेवीचेही त्यांच्यावर प्रेम होते, पण तिने लग्नासाठी अट ठेवली होती. मिथुन यांनी त्यांची पत्नी योगिता बाली यांना आधी घटस्फोट द्यावा अशी तिची इच्छा होती. तरच, ती त्याच्याशी लग्न करेल. यानंतर मिथुन यांनी योगितावर घटस्फोटासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली आणि त्यामुळेच योगिता यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. यानंतर मिथुन चक्रवर्ती कोलमडून गेले. योगिता यांच्या या कठोर पावलानंतर मिथुन आणि श्रीदेवी यांच्यात दुरावा निर्माण झाला आणि बघता बघता ही प्रेमकहाणी संपली. त्यानंतर श्रीदेवीने 8 वर्षांनी मोठ्या बोनी कपूरसोबत लग्न केले.(photo:mithun_chakraborty_is_the_king/ig)