एक्स्प्लोर

AIच्या मदतीने साकारलेला मराठी चित्रपट; ‘त्यांची वारी’चा अभिनव प्रयोग; YouTubeवर पाहता येणार

या संपूर्ण प्रक्रियेत आलेले अनुभव, अडचणी आणि काही रंजक किस्से भविष्यात प्रेक्षकांसोबत शेअर केले जाणार आहेत.

AI Marathi Movie: कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI तंत्रज्ञानाचा वापर करून संपूर्णपणे साकारण्यात आलेला मराठी चित्रपट तयार झाला असून, ‘त्यांची वारी’ या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे. महाराष्ट्रातून मराठीमध्ये करण्यात आलेला हा अभिनव प्रयोग असल्याचा निर्मात्यांचा दावा आहे. चित्रपटाचा ट्रेलरही प्रदर्शित झाला असून, लवकरच हा चित्रपट YouTubeवरील ‘FUKatta (फुकट्टा)’ या चॅनेलवर प्रदर्शित होणार आहे.

AIच्या मदतीने तयार केला संपूर्ण चित्रपट

‘त्यांची वारी’ या चित्रपटाची निर्मिती AI तंत्रज्ञानाच्या सहाय्याने करण्यात आल्याचं निर्मात्यांनी सांगितलं आहे. चित्रपटातील प्रत्येक दृश्य, पात्र, गीत, पार्श्वसंगीत आणि दृश्यात्मक मांडणी AIच्या मदतीने साकारण्यात आली आहे.

संपूर्ण चित्रपटाची निर्मिती AI तंत्रज्ञानाच्या सहाय्याने करण्याचे प्रयोग जगभरात अजूनही अत्यंत दुर्मिळ आहेत. अशा परिस्थितीत महाराष्ट्रातून मराठी भाषेत हा प्रयोग करण्यात आल्याने चित्रपट तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात याकडे एका वेगळ्या आणि अभिनव प्रयत्नाच्या रूपात पाहिलं जात आहे.

AIची मर्यादा जाणवत असतानाही प्रयोग पूर्ण

चित्रपटाच्या निर्मितीदरम्यान AI तंत्रज्ञानाच्या काही मर्यादांचाही अनुभव आल्याचं निर्मात्यांनी स्पष्ट केलं आहे. AI तंत्रज्ञान अजूनही विकसित होत असून, पारंपरिक चित्रपट निर्मितीच्या दर्जापर्यंत पोहोचण्यासाठी AI आधारित साधनांना आणखी प्रगल्भ होण्याची गरज असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

या मर्यादांमुळे चित्रपटातील काही प्रसंग वगळावे लागले, काही संवाद संक्षिप्त करावे लागले, तर काही दृश्यांमध्ये आवश्यक बदल करण्यात आले. या संपूर्ण प्रक्रियेत आलेले अनुभव, अडचणी आणि काही रंजक किस्से भविष्यात प्रेक्षकांसोबत शेअर केले जाणार आहेत.

‘त्यांची वारी’चा ट्रेलर YouTubeवर

दरम्यान, ‘त्यांची वारी’चा ट्रेलर ‘FUKatta (फुकट्टा)’ या YouTube चॅनेलवर उपलब्ध आहे. निर्मात्यांनी प्रेक्षकांना ट्रेलर पाहण्याचं, चॅनेल Subscribe करण्याचं आणि व्हिडीओ Like करण्याचं आवाहन केलं आहे. तसंच, या प्रयोगाबद्दल प्रेक्षकांनी आपली प्रतिक्रिया नक्की द्यावी, असंही सांगण्यात आलं आहे.

चित्रपट कधी प्रदर्शित होणार?

‘त्यांची वारी’ हा चित्रपट लवकरच ‘FUKatta (फुकट्टा)’ या YouTube चॅनेलवर प्रदर्शित होणार आहे. AIच्या मदतीने मराठी चित्रपट निर्मितीचा हा प्रयोग प्रेक्षकांना कितपत आवडतो आणि या नव्या तंत्रज्ञानाच्या वापराबाबत त्यांची प्रतिक्रिया काय असते, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. AI आणि सिनेमा यांचं हे अनोखं मिश्रण मराठी चित्रपटसृष्टीत नव्या प्रयोगांना चालना देणार का, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pravin Tarde: नवीन गाडी घेतल्यावर जुनी गाडी स्ट्रगल करणाऱ्या कलाकारांना देतात प्रवीण तरडे; कारण सांगत म्हणाले...
नवीन गाडी घेतल्यावर जुनी गाडी स्ट्रगल करणाऱ्या कलाकारांना देतात प्रवीण तरडे; कारण सांगत म्हणाले...
‘मी संसार माझा रेखिते’मध्ये नवरात्री स्पेशल महाट्विस्ट; लेकीच्या संरक्षणासाठी अनुप्रिया धारण करणार दुर्गेचं रूप
‘मी संसार माझा रेखिते’मध्ये नवरात्री स्पेशल महाट्विस्ट; लेकीच्या संरक्षणासाठी अनुप्रिया धारण करणार दुर्गेचं रूप
Bharat Jadhav Webseries: भरत जाधव नव्या अंदाजात, वेब शोमध्ये झळकणार, 'कोण यशवंत पानसरे' चर्चेत; कोर्ट रुम ड्रामा कुठे अन् कधी पाहता येणार?
भरत जाधव नव्या अंदाजात, वेब शोमध्ये झळकणार, 'कोण यशवंत पानसरे' चर्चेत; कोर्ट रुम ड्रामा कुठे अन् कधी पाहता येणार?
Naach Na Marathi Song: महाराष्ट्र ते मेक्सिको! स्वॅगर बॉय आणि फ्रीबोटचं 'नाच ना' गाणं रिलीज, मराठी-हिंदी-स्पॅनिशचा अनोखा संगम
महाराष्ट्र ते मेक्सिको! स्वॅगर बॉय आणि फ्रीबोटचं 'नाच ना' गाणं रिलीज, मराठी-हिंदी-स्पॅनिशचा अनोखा संगम
Advertisement

व्हिडीओ

Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!
Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Neha Bora Video: दिल्ली पोलिसांना दिल्लीच्या रस्त्यांवर घामटा फोडणारी नेहा बोरा सुद्धा इंडिया आघाडीच्या मोर्चात; योगेंद्र यादवांसोबत राहुल गांधींच्या बसमध्ये
Video: दिल्ली पोलिसांना दिल्लीच्या रस्त्यांवर घामटा फोडणारी नेहा बोरा सुद्धा इंडिया आघाडीच्या मोर्चात; योगेंद्र यादवांसोबत राहुल गांधींच्या बसमध्ये
दुष्काळाने त्रस्त शेतकऱ्यांना बँकेतही मनस्ताप; बँक कर्मचारी काम सोडून वाढदिवस सेलिब्रेशनमध्ये दंग
दुष्काळाने त्रस्त शेतकऱ्यांना बँकेतही मनस्ताप; बँक कर्मचारी काम सोडून वाढदिवस सेलिब्रेशनमध्ये दंग
Jantar Mantar: सीजेपीच्या 36 दिवसांच्या आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा पडला अन् आता तब्बल 33 वर्षांनंतर जंतर मंतर आंदोलनस्थळातून हद्दपार, केंद्रीय गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय
सीजेपीच्या 36 दिवसांच्या आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा पडला अन् आता तब्बल 33 वर्षांनंतर जंतर मंतर आंदोलनस्थळातून हद्दपार, केंद्रीय गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय
Pimpri Chinchwad Crime News : मंदिरात गेली नमस्कार केला; बाहेर निघण्याआधी अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न, निगडीतील मंदिरात घडली घटना, मेट्रो कामगाराचं संतापजनक कृत्य
मंदिरात गेली नमस्कार केला; बाहेर निघण्याआधी अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न, निगडीतील मंदिरात घडली घटना, मेट्रो कामगाराचं संतापजनक कृत्य
सनातनी धर्म मान्य करा, गोमूत्र मिश्रित कुंकवाचा टिळा लावा, तेव्हाच गरबा प्रवेश; भाजप नेत्याचा गरबा महोत्सव वादात
सनातनी धर्म मान्य करा, गोमूत्र मिश्रित कुंकवाचा टिळा लावा, तेव्हाच गरबा प्रवेश; भाजप नेत्याचा गरबा महोत्सव वादात
Tejasvee Ghosalkar: एआयने आठवणी जिवंत केल्या, अभिषेक घोसाळकरांना पाहताच तेजस्वी घोसाळकरांच्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागले, नेमकं काय घडलं?
एआयने आठवणी जिवंत केल्या, अभिषेक घोसाळकरांना पाहताच तेजस्वी घोसाळकरांच्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागले, नेमकं काय घडलं?
Rahul Gandhi on PM Modi: 'मोदीजी आपल्या सरकारमधील 200 अधिकारी आमच्या संपर्कात; ED, CBI ची आतली माहिती आम्हाला देत आहेत, त्यामुळे तुम्ही..' राहुल गांधींचा सनसनाटी गौप्यस्फोट
'मोदीजी आपल्या सरकारमधील 200 अधिकारी आमच्या संपर्कात; ED, CBI ची आतली माहिती आम्हाला देत आहेत, त्यामुळे तुम्ही..' राहुल गांधींचा सनसनाटी गौप्यस्फोट
भीमनवारांची चौकशी तुकाराम मुंढे करू शकत नाहीत; गुणरत्न सदावर्तेंची प्रतिक्रिया, पुण्यातील आंदोलनावर टीका
भीमनवारांची चौकशी तुकाराम मुंढे करू शकत नाहीत; गुणरत्न सदावर्तेंची प्रतिक्रिया, पुण्यातील आंदोलनावर टीका
Embed widget