एक्स्प्लोर
Malti Marie Birthday Celebration: प्रियांका-निक जोनासची लेक मालतीचा दुसरा वाढदिवस! पाहा क्युट फोटो!
Malti Marie Birthday Celebration: प्रियांका-निक जोनासची लेक मालतीचा दुसरा वाढदिवस! पाहा क्युट फोटो!

Entertainment Bollywood Malti Marie Birthday Celebration (Photo Credit : unsplash)
1/10

अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांची मुलगी मालती मेरी हिचा नुकताच दुसरा वाढदिवस साजरा करण्यात आला. मालतीचा दुसरा वाढदिवस तिने तिच्या कुटुंबियांसोबत साजरा केला.
2/10

प्रियांकाने तिच्या लेकीचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला. मालतीच्या वाढदिवसाच्या पार्टीची थीम एल्मो होती. प्रियांकानं मालतीच्या बर्थ-डे सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
3/10

मालतीच्या वाढदिवशी प्रियांकानं संपूर्ण कुटुंबासह एलएमधील मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. प्रियांकाने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये मालतीच्या गाळ्यात मोठा हार दिसत आहे.
4/10

फोटो शेअर करुन प्रियांकानं कॅप्शनमध्ये लिहिलं,"ती आमची मिरॅकल आहे आणि ती 2 वर्षांची झाली आहे." प्रियांका आणि निकने मालतीचा वाढदिवस संपूर्ण कुटुंबासोबत बीचवर साजरा केला.
5/10

मालतीच्या बर्थडे सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. प्रियांकानं शेअर केलेल्या फोटोवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
6/10

प्रियांकानं शेअर केलेल्या फोटोमध्ये मालती पिंक टॉप, रेड पँट, डोळ्यावर गॉगल अन् डोक्यावर क्राऊन अशा लूकमध्ये दिसत आहे. मालतीच्या या क्यूट लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
7/10

प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांनी 2018 साली लग्नगाठ बांधली. राजस्थानमधील जोधपूर येथील त्यांचा शाही विवाह सोहळा पार पडला होता. प्रियांकानं 2022 मध्ये मालतीला जन्म दिला. प्रियांकानं बॉलिवूडसोबतच हॉलिवूडमध्ये देखील विशेष ओळख निर्माण केली आहे.
8/10

प्रियांकाच्या आगामी चित्रपटांची तिचे चाहते उत्सुकतेने वाट बघतात. प्रियांका ही ‘जी ले जरा’ या चित्रपटामधून देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे, असं म्हटलं जात आहे.
9/10

तिची 'सिटाडेल' ही सीरिज काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आली. फॅशन,बाजीराव मस्तानी,बर्फी आणि मेरी कॉम यांसारख्या चित्रपटातील प्रियांकाच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं.
10/10

थमिजहन या चित्रपटातून प्रियंकाने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. तर अंदाज या चित्रपटातून तिनं बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली.
Published at : 18 Jan 2024 04:48 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
मुंबई
महाराष्ट्र
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
