एक्स्प्लोर
धारावी झोपडपट्टी ते बॉलिवूडमध्ये पदार्पण, विनोदी अभिनयात किंग असलेल्या जॉनी लिव्हरच्या 'या' गोष्टी माहिती आहेत का?
लोकांना पोट धरून हसवणार्या जॉनी लिव्हर या अभिनेत्याच्या वाटेला अनेक दु:ख, हालअपेष्टा आल्या.
जॉनी लिव्हर यांचा संघर्ष एखाद्या चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाही.
1/7

आंध्र प्रदेशातील कनिगिरीमध्ये 14 ऑगस्ट 1957 रोजी जॉनी लिव्हर यांचा जन्म झाला होता. जॉनी लिव्हर यांचे खरे नाव जॉन प्रकाश राव जनुमाला आहे.
2/7

कॉमेडीच्या क्षेत्रात नावलौकिक मिळवणारे जॉनी लिव्हर मुंबईच्या धारावीच्या झोपडपट्टीत लहाणाचे- मोठे झालेले आहे.
3/7

जॉनी लिव्हर यांच्या घराची परिस्थिती हालाकीची असल्याकारणाने ते इयत्ता 7 वी पर्यंतच शिक्षण घेऊ शकले.
4/7

जॉनी यांचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला. वयाच्या 15 व्या वर्षी त्यांनी रस्त्यावर पेन विकून आपला उदरनिर्वाह केला.
5/7

सुनील दत्त यांनी जॉनीला त्यांच्या 'दर्द का रिश्ता' या चित्रपटात काम करण्याची संधी दिली.
6/7

जॉनी लिव्हर यांनी जवळपास 400 चित्रपटांमध्ये काम केले आहे. मिमिक्री कलाकार असलेले जॉनी लिव्हर हे अभिनेते म्हणून नावारुपाला आले.
7/7

आपल्या सिने कारकिर्दीत जॉनी लिव्हर यांनी हत्या, बाजीगर, राजा हिंदुस्तानी, दुल्हे राजा, जुदाई, कुछ कुछ होता है, नायक यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. जॉन लिव्हर यांना दोन वेळा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला आहे.
Published at : 16 Aug 2024 03:26 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
क्रिकेट
पुणे
व्यापार-उद्योग
























