एक्स्प्लोर
Cleanliness campaign at Juhu Beach : महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा स्तुत्य उपक्रम, उत्कर्ष शिंदेसह मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यांची स्वच्छता मोहीम
Cleanliness campaign at Juhu Beach : मुंबईतील समुद्रकिनाऱ्यावर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून स्वच्छता मोहिम राबण्यात आली.
Cleanliness campaign at Juhu Beach
1/6

पर्यावरण संवर्धनासाठी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने मुंबईतील सेंट विल्फ्रेड कॉलेज, एन. एल. दलमिया कॉलेज आणि रॉयल कॉलेज यांनी मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) युनिट्सच्या सहकार्याने जुहू बीचवर भव्य स्वच्छता अभियानाचे आयोजन केले.
2/6

या अभियानात 100 हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आणि समुद्रकिनाऱ्याचे स्वच्छतेचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवले.
3/6

या स्वच्छता मोहीमेला प्रोत्साहन देण्यासाठी मराठी बिग बॉस स्टार डॉ. उत्कर्ष शिंदे आणि बॉलिवूड अभिनेता डॉ. आशिष गोखले यांनीही हजेरी लावली.
4/6

या मोहिमेचे यशस्वी आयोजन करण्यात मुंबई पोलिस, मुंबई महानगरपालिका (BMC) आणि अन्य सामुदायिक सेवांचे विशेष आभार मानण्यात आले.
5/6

यावेळी आशिष गोखलेने प्रतिक्रिया देताना म्हटलं की, "प्रत्येक छोटासा प्रयत्न महत्त्वाचा असतो. एकत्रितपणे आपण एक स्वच्छ, निरोगी जग निर्माण करू शकतो,"
6/6

विद्यार्थ्यांनी जुहू बीचवरील प्लास्टिक कचरा, डिस्कर्डेड वस्तू आणि अन्य कचरा गोळा करून स्वच्छता केली. यावेळी विद्यार्थ्यांना कचरा व्यवस्थापन, प्लास्टिक वापर कमी करण्याचे महत्त्व, आणि पर्यावरणावर होणाऱ्या प्रदूषणाच्या दुष्परिणामांबद्दल मार्गदर्शन करण्यात आले.
Published at : 19 Sep 2024 03:50 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
क्रिकेट
विश्व
व्यापार-उद्योग























