एक्स्प्लोर
Bigg Boss 18: एकीकडे रिअल लाईफमध्ये घटस्फोटाच्या चर्चा, त्यात बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेणार भाईजानची हिरोईन?
Bigg Boss 18: सलमान खान होस्ट आणि 'बिग बॉस'चा शो, प्रेक्षकांसाठी डेडली कॉम्बिनेशन लवकरच टीव्हीवर दाखल होणार आहे. अशा परिस्थितीत शोबाबत रोज नवनवीन अपडेट्स समोर येत आहेत.

Urmila Matondkar | Bigg Boss 18
1/10

लवकरच 'बिग बॉस 18' प्रेक्षकांच्या भेटीसाठी येणार आहे. अशातच यंदा बिग बॉस हिंदीच्या घरात यंदा बॉलिवूडचा दबंग भाईजान सलमान खानसोबत स्क्रिन शेअर केलेली अभिनेत्री जाणार असल्याच्या चर्चा आहेत.
2/10

टेलिव्हिजन विश्वातील सर्वात लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त रिॲलिटी शो 'बिग बॉस 18' 6 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. अशा परिस्थितीत नुकतीच या शोबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. रिपोर्ट्सनुसार, या सीझनमध्ये सलमान खानची एक हिरोईनही सहभागी होणार आहे. सध्या ही बॉलिवूडची सौंदर्यवती तिच्या घटस्फोटामुळे चर्चेत आहे. अशातच आता बिग बॉसच्या घरात जाण्याच्या चर्चांमुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता दिसून येत आहे.
3/10

आम्ही सांगत आहोत, भाईजानसोबत स्क्रिन शेअर करणाऱ्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकरबद्दल. अभिनेत्रीच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. दरम्यान, आता ती 'बिग बॉस 18' च्या घरात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे.
4/10

मीडिया रिपोर्ट्सनुसार, नव्वदीच्या काळात रुपेरी पडदा गाजवणारी सौंदर्यवती उर्मिला मातोंडकर 'बिग बॉस 18'च्या घरात सहभागी होऊ शकते. सोशल मीडियावर एक ट्विटर हँडल 'बिग बॉस तक'नं लेटेस्ट ट्वीटमध्ये याबाबतची माहिती दिली आहे.
5/10

महत्त्वाची बाब म्हणजे, उर्मिता मातोंडकर बिग बॉस मराठीच्या घरात जाणार याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण, बिग बॉस तकनं केलेल्या ट्वीटनंतर जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत.
6/10

उर्मिला मातोंडकर सध्या पती मोहसीनपासून घटस्फोटाच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, उर्मिलानं लग्नाच्या 8 वर्षानंतर पती मोहसीनपासून वेगळं होण्यासाठी घटस्फोटाची याचिका दाखल केली आहे. मात्र अभिनेत्रीनं यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
7/10

उर्मिला मातोंडकरनं बाल कलाकार म्हणून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. यानंतर उर्मिलानं अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं. ज्या-ज्या वेळी उर्मिलाचं नाव घेतलं जातं, त्या-त्यावेळी सत्या, रंगीला, कौन या चित्रपटांची नावं डोळ्यासमोर येतात.
8/10

उर्मिलानं सलमान खानसोबत 'जानम समझ करो' या चित्रपटात काम केलं होतं. हा चित्रपट 1999 साली प्रदर्शित झाला होता. त्यामुळे सलमान-उर्मिला ही हिट जोडी पुन्हा एकदा बिग बॉसच्या मंचावर एकत्र पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.
9/10

उर्मिला चित्रपटांपासून दूर असली तरी ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिचे अनेक फॉलोअर्स आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वी उर्मिलानं राजकारणातही एन्ट्री केली होती.
10/10

image 10
Published at : 02 Oct 2024 07:07 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
बॉलीवूड
नाशिक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion