एक्स्प्लोर
Bollywood Films Released Again : तुंबाड ते गँग्स ऑफ वासेपूर... पुन्हा एकदा थिएटरमध्ये रिलीज होणार ब्लॉकबस्टर चित्रपट
These Bollywood Films Will Be Released Again: कधीकाळी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणारे काही चित्रपट पुन्हा एकदा थिएटरमध्ये रिलीज होत आहेत. त्यामुळे सिनेप्रेमींना मनोरंजनाची एक पर्वणी मिळणार आहे.

बॉलिवूडमध्ये काही वर्षांपूर्वी रिलीज झालेले चित्रपट पुन्हा रिलीज करण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे. अनेक वर्षानंतर या चित्रपटांनी थिएटर्समध्ये कमबॅक केले आहे. या चित्रपटांच्या यादीत काही कल्ट चित्रपटांचाही समावेश आहे.
1/8

तुंबाड - या यादीत पहिले नाव हॉरर चित्रपट तुंबाडचे नाव आहे. हा चित्रपट 6 वर्षानंतर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 30 ऑगस्ट रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे.
2/8

गँग्स ऑफ वासेपूर - या यादीत अनुराग कश्यपचा कल्ट चित्रपट गँग्स ऑफ वासेपूरचाही समावेश आहे. या चित्रपटाच्या री-रिलीजची घोषणा अनुराग कश्यपने सोशल मीडियावर केली आहे.
3/8

रहना है तेरे दिल में – आर माधवन आणि दिया मिर्झा यांचा कल्ट क्लासिक चित्रपट 'रहना है तेरे दिल में' पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 30 ऑगस्ट 2024 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.
4/8

लैला मजनू- याआधी तृप्ती डिमरीचा पहिला चित्रपट 'लैला मजनू' 9 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. लोकांनी या चित्रपटाला चांगला प्रतिसाद दिला.
5/8

रॉकस्टार - रणबीर कपूरचा ब्लॉकबस्टर चित्रपट रॉकस्टार ही नुकताच थिएटरमध्ये रिलीज करण्यात आला होता. रणबीर सोबत नर्गिस फाखरीचीही भूमिका आहे. या चित्रपट पुन्हा रिलीज झाल्यानंतर 5 कोटींची कमाई केली असल्याचे वृत्त आहे.
6/8

राजा बाबू - बॉलिवूडचा नंबर वन हिरो गोविंदाचा 'राजा बाबू' चित्रपटही या यादीत आहे. 1994 मध्ये पहिल्यांदा चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. आता नुकताच री-रिलीज झाला.
7/8

दंगल - आमिर खानचा चित्रपट दंगल देखील या री-रिलीजच्या यादीत आहे. फातिमा सना शेख, सान्या मल्होत्रा, अपारशक्ती खुराना आदींच्या भूमिका आहे. कुस्तीपटू महावीर फोगट आणि त्यांच्या कुस्तीपटू मुलींवर चित्रपटाची कथा आहे.
8/8

हम आपके है कौन - 1994 मध्ये रिलीज झालेला सूरज बडजात्याचा 'हम आपके है कौन' हा चित्रपट 30 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा थिएटरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सलमान खान आणि माधुरीची प्रेमकथा चित्रपटात अतिशय सुंदरपणे दाखवण्यात आली आहे.
Published at : 28 Aug 2024 08:47 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
पुणे
विश्व
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
