एक्स्प्लोर
Shahrukh Khan: इंडस्ट्रीमधील एकमेव अभिनेता जो निगेटिव्ह भूमिका करुनही सर्वात मोठा नायक झाला
शाहरुख खान (संग्रहित छायाचित्र)
1/9

बॉलिवूडमधील नायकाची व्याख्या काय आहे ... जो माणूस प्रामाणिक आहे, तो कोणाचंही नुकसान करीत नाही, जो प्रत्येकाला आवडतो, नायिका ज्याच्यावर जीवापाड प्रेम करते आणि जो व्हिलनला हरवतो. पण. इंडस्ट्रीमध्ये एक व्यक्ति असा आहे ज्याने ही व्याख्या बदलली. (फोटो - सोशल मीडिया)
2/9

तो शाहरुख खान आहे. कोणत्याही अभिनेत्याच्या करियरमध्ये सुरुवातीचा टप्पा फार महत्वाचा असतो. कारण सुरुवातीची काही वर्षांमध्येच एखाद्या अभिनेत्याचा सुवर्ण भविष्यावर अवलंबून असतात. काही निर्णय त्यांचे भविष्य घडवतात तर काही खराब करतात. पण शाहरुखने आपल्या कारकीर्दीत सुरुवातीच्या काळात असा धोका पत्करला, जो इतर अभिनेते कधीच स्वीकारणार नाही. विशेषत: 90 च्या दशकात. (फोटो - सोशल मीडिया)
3/9

आजचा चित्रपटाचा प्रेक्षण पूर्णपणे बदलला आहे. मात्र, 90 च्या दशकात प्रेक्षकांची समज आणि निवड काही वेगळी होती. त्यावेळी प्रेक्षकांना नायकाला खलनायकाच्या रुपात पाहणे कधीच आवडत नव्हतं. तरीही शाहरुख खानने एकदा नव्हे तर बर्याच चित्रपटांमध्ये हा धोका पत्करला आणि तरीही तो इंडस्ट्रीचा हिरो झाला. (फोटो - सोशल मीडिया)
4/9

याची सुरुवात 1993 मध्ये रिलीज झालेल्या बाजीगरपासून झाली. शाहरुखला या चित्रपटात पाहून लोक आश्चर्यचकित झाले. बरं चित्रपटाचा कोणताही नायक असा असू शकतो, हे पहिल्यांदाच प्रेक्षकांसमोर आलं. या चित्रपटानंतर शाहरुखचे करिअर संपेल अशी भीती लोकांना होती. पण घडलं उलट. (फोटो - सोशल मीडिया)
5/9

त्याच वर्षी त्याचा डर चित्रपट आला, ज्यामध्ये सनी देओल, जूही चावला आणि शाहरुख खान मुख्य भूमिकेत होते. सनीने या चित्रपटात नायकाची भूमिका साकारली होती, तर शाहरुख खानने खलनायकाची भूमिका साकारली होती. खलनायकही काही असा तसा नव्हता.. प्रेमात पूर्णपणे वेडा झालेला प्रेमवीर ज्याने नायिकेचे आयुष्य नरक बनविले. निगेटिव्ह भूमिका असूनही, शाहरुखला खूप पसंत केले. आजही या चित्रपटाचे नाव घेतले की सनीपेक्षा जास्त शाहरुखची आठवण काढली जाते. (फोटो - सोशल मीडिया)
6/9

'डर' नंतर 1994 साली आलेल्या 'अंजाम' या चित्रपटातील शाहरुख खानची व्यक्तिरेखासुद्धा अशीच होती. मुख्य भूमिकेत असलेल्या माधुरी दीक्षितला मिळवण्यासाठी तो सर्व मर्यादा ओलांडतो. यासाठी एखाद्याचा खून करण्याची वेळ आली तरी मागेपुढे पहात नाही. (फोटो - सोशल मीडिया)
7/9

डुप्लिकेटमध्ये शाहरुख खानची दुहेरी भूमिका होती. एक नायक आणि दुसरा खलनायक. हा चित्रपट एक अॅक्शन कॉमेडी होता. लोकांना यातील शाहरुखचे नकारात्मक पात्रदेखील आवडले होते. (फोटो - सोशल मीडिया)
8/9

साल 2000 मध्ये आलेल्या 'जोश' चित्रपटात चंद्रचूड सिंह हीरो होता तर शाहरुख नकारात्मक भूमिकेत होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी चांगली कामगिरी करु शकला नाही. मात्र, या भूमिकेमुळे त्याची लोकप्रयिता वाढली. (फोटो - सोशल मीडिया)
9/9

2006 मध्ये 'डॉन'मध्ये शाहरुख खानने डॉनची भूमिका केली होती. जो सर्व प्रकारच्या बेकायदेशीर कामे करतो. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर केलेल्या कमाईवरुन आपल्या लक्षात येईल की प्रेक्षकांना किती आवडला होता. (फोटो - सोशल मीडिया)
Published at : 23 Apr 2021 08:34 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
महाराष्ट्र
पुणे
पुणे























