एक्स्प्लोर
Emraan Hashmi : 10 वर्षात 11 फ्लॉप, इमरानचं करिअर सलमान खान सावरणार का?
इमरान आणि अक्षयच्या सेल्फी चित्रपटाला तीन दिवसात फक्त सहा कोटी कमवता आलेत
Emraan Hashmi
1/8

Emraan Hashmi ने ‘सेल्फी’ चित्रपटाच्या माध्यामातून दणक्यात पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. पण त्यात त्याला अपयश आले.
2/8

सेल्फी चित्रपट सपाटून आपटला. इमरान हाशमीने मागील दहा वर्षात तब्बल 11 फ्लॉप चित्रपट दिले आहेत.
3/8

इमरान हाशमी याने सुरुवातीच्या काळात एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले आहेत. पण गेल्या काही वर्षांपासून त्याचे चित्रपट सपाटून आपटत आहेत. तिकिटखिडकीवर लोक येत नाहीत.
4/8

इमरान याने अक्षय कुमारसोबत सेल्फी चित्रपटातून दणक्यात पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. मात्र सेल्फी चित्रपटाने तीन दिवसात फक्त 6 कोटींचं कलेक्शन केलेय. मोठे कलाकार असतानाही चित्रपट फ्लॉप ठरला.
5/8

इमरानसाठी मागील दहा वर्ष खूप कठीण होती. दहा वर्षात इम्रानचे 11 चित्रपट फ्लॉप झाले आहेत. त्यामुळे त्याला आता चित्रपट मिळणेही कठीण झालेय.
6/8

2013 पासून आतापर्यंत इमरान याने एक थी डायन, ‘घनचक्कर’, ‘नटवरलाल’, ‘मिस्टर एक्स’ यासोबत 11 चित्रपटात मुख्य भूमिका केली आहे. पण सर्व चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले.
7/8

2003 मध्ये इमरानने ‘फूटपाथ’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतरही प्रत्येक वर्षाला त्याने सरासरी दोन तरी चित्रपटे केले. यामध्ये अनेक चित्रपट यशस्वी ठरले. पण 2013 नंतर इमरानचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरू लागले. 2018 आणि 2020 मध्ये एकही चित्रपट आला नाही.
8/8

आता इमरानला सलमान खान याच्या टायगर 3 या चित्रपटाकडून मोठ्या आपेक्षा असतील. सलमान खान इमरानचं करिअर वाचवणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
Published at : 27 Feb 2023 11:38 PM (IST)
Tags :
Emraan Hashmiआणखी पाहा























