एक्स्प्लोर
Rajkumar Hirani: बॅक टू बॅक हिट चित्रपट,20 वर्षात एकही चित्रपट झाला नाही फ्लॉप; जाणून घ्या राजकुमार हिरानींच्या चित्रपटांबद्दल
Rajkumar Hirani: राजकुमार हिरानी हे गेली 20 वर्ष चित्रपटांचा दिग्दर्शन करत आहेत. आतापर्यंत त्यांनी दिग्दर्शित केलेला एकही चित्रपट फ्लॉप ठरला नाही.

Rajkumar Hirani
1/9

बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार हिरानी हे त्यांच्या चित्रपटांनी प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतात.
2/9

राजकुमार हिरानी यांचा आज 61 वा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात त्यांच्या चित्रपटांबद्दल
3/9

राजकुमार हिरानी हे दिग्दर्शक होण्यापूर्वी चित्रपटांचे एडिंग करायचे. 2003 मध्ये त्यांनी पहिला चित्रपट 'मुन्नाभाई एमबीबीएस' दिग्दर्शित केला, जो बॉक्स ऑफिसवर हिट ठरला.
4/9

2006 मध्ये राजकुमार हिरानी यांनी 'लगे रहो मुन्नाभाई' हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. हा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता.
5/9

राजकुमार हिरानी यांनी दिग्दर्शित केलेला '3 इडियट्स' हा चित्रपट 2009 मध्ये रिलीज झाला. या चित्रपटात आमिर खान, आर माधवन आणि शर्मन जोशी यांनी प्रमुख भूमिका साकारली. या चित्रपटानं देखील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला.
6/9

2014 मध्ये राजकुमार हिरानी यांचा पिके हा चित्रपट रिलीज झाला. अनेकांनी या चित्रपटाचं कौतुक केलं. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई केली होती.
7/9

राजकुमार हिरानी यांचा 'संजू' हा चित्रपट 2018 मध्ये रिलीज झाला. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर जवळपास 586.85 कोटींची कमाई केली.
8/9

आता राजकुमार हिरानी यांचा डंकी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात तापसी पन्नू, विक्की कौशल आणि शाहरुख खान हे प्रमुख भूमिका साकारणार आहेत.
9/9

राजकुमार हिरानी यांचा डंकी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती कमाई करेल? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
Published at : 20 Nov 2023 09:14 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
राजकारण
बातम्या
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
