एक्स्प्लोर
In Pics: ठाण्यातील अभिनय कट्ट्यावर ज्येष्ठ साहित्यिकांच्या स्मरणार्थ अंधबांधवांसोबत साजरा झाला अनोखा दीपोत्सव

katta_1
1/6

ठाण्यातील अभिनय कट्टयावर किरण नाकती यांच्या संकल्पनेतून जेष्ठ साहित्यिक व अंध बांधवांच्या उपस्थितीत रंगला अनोखा दीपोत्सव.
2/6

तिमिरातुनी तेजाकडे असे म्हणत ठाण्यातील ज्येष्ठ साहित्यिकांच्या हस्ते अंध बांधवांना सोबत घेऊन दिवंगत साहित्यिकांच्या स्मरणार्थ अकरा दिवे लावण्यात आले.
3/6

पु. ल. देशपांडे, वि. वा. शिरवाडकर, वि. स. खांडेकर, सुनिता देशपांडे, रत्नाकर मतकरी, व्यंकटेश माडगूळकर, व पू काळे, द मा मिरासदार, विं दा करंदीकर, शंकर पाटील, मुरलीधर गोडे या अकरा श्रेष्ठ दिवंगत साहित्यिकाच्या स्मरणार्थ ठाण्यातील अकरा ज्येष्ठ साहित्यिकांनी अंध बांधवांना सोबत घेऊन दिप प्रज्वलित केले.
4/6

नव्या पिढीमध्ये साहित्य वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून या दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
5/6

साहित्य संस्कृती लोप पावत चालली असल्याने हा दीपोत्सव नक्कीच प्रेरणा देणारा ठरणार आहे.
6/6

याप्रसंगी अभिनय कट्टा व ओमकार अंध सेवक सोसायटीच्या वतीने एकावन्न अंध बांधवांना दिवाळी भेट देण्यात आली.
Published at : 01 Nov 2021 11:01 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
मुंबई
मुंबई
नाशिक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
