एक्स्प्लोर
(Source: ECI | ABP NEWS)
PHOTO : अमिताभ बच्चन ते अक्षय कुमार, नव्वदच्या या सुपरस्टार्सना मिळायची एका चित्रपटासाठी 'एवढी' रक्कम
Feature_Photo_2
1/8

बॉलिवूडच्या सुपरस्टार्सच्या खासगी जीवनाबद्दल जाणून घेण्यामध्ये त्यांच्या चाहत्यांना रुची असते. आपल्या आवडत्या स्टारला एका चित्रपटाचे किती रुपये मिळतात याची माहितीही घ्यायला अनेकजण उत्सुक असतात. नव्वदच्या दशकातील स्टार्सना एका चित्रपटासाठी किती मानधन मिळायचं याची आज माहिती घेऊया.
2/8

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना पडद्यावर पहायला अनेकजण उत्सुक असायचे. आजचा महानायक हा तेव्हांही महानायकच असल्याचं सिध्द होतंय. कारण 90 च्या दशकातही अमिताभ हे एका चित्रपटासाठी जवळपास तीन कोटी रुपये मानधन घ्यायचे.
3/8

'फूल और कांटे' या चित्रपटातून धमाकेदार एन्ट्री करणाऱ्या अजय देवगनला एका चित्रपटाचे 70 लाख रुपये मिळायचे.
4/8

खिलाडी अक्षय कुमारला एका चित्रपटासाठी जवळपास 55 लाख रुपये मिळायचे.
5/8

आपल्या जबरदस्त डॉयलॉगने रसिकांच्या मनावर राज्य करणाऱ्या नाना पाटेकरांना एका चित्रपटाचे जवळपास 50 लाख रुपये मिळायचे.
6/8

घायल सारखे अनेक सुपरहिट चित्रपट देणाऱ्या सनी देवलला एका चित्रपटासाठी 60 ते 70 लाख रुपये मिळायचे.
7/8

गोपी किशन सारख्या हिट चित्रपटात काम करणाऱ्या सुनिल शेट्टीला एका चित्रपटाचे 30 लाख रुपये मिळायचे.
8/8

बॉलिवूडचा बादशाह म्हणजे शाहरुखला एका चित्रपटाचे 30 लाख रुपये मिळायचे.
Published at : 28 Aug 2021 01:32 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























