एक्स्प्लोर
शिबानी दांडेकरच्या वेडिंग लूकबद्दलच्या खास गोष्टी जाणून घेऊयात....
(photo:shibanidandekar/ig)
1/8

बॉलीवूड अभिनेता फरहान अख्तर (Farhan Akhtar) आणि शिबानी दांडेकर (Shibani Dandekar) 19 फेब्रुवारी रोजी लग्नबंधनात अडकले. (photo:shibanidandekar/ig)
2/8

मोजक्या पाहूण्यांच्या उपस्थितीत शिबानी आणि फरहानचा विवाह सोहळा पार पडला. (photo:shibanidandekar/ig)
3/8

नुकतेच फरहान आणि शिबानी यांनी त्यांच्या लग्न सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. या फोटोमधील शिबानीच्या आऊट फिटनं अनेकांचं लक्ष वेधलं. तिच्या वेडिंग लूकच्या खास गोष्टी जाणून घेऊयात.... (photo:shibanidandekar/ig)
4/8

क्रोसेट टॉप आणि स्कर्ट असा लूक शिबानीनं लग्नसोहळ्यासाठी केला होता. (photo:shibanidandekar/ig)
5/8

शिबानीचा हा रेड गाऊन हँड अँब्रॉयटरीनं तयार करण्यात आला आहे. शिबानीनं गोयनका इंडिया या कंपनीनं डिझाइन केलेले रूबी डँगलर्स इअरिंग्स घातले होते. (photo:shibanidandekar/ig)
6/8

हे इअरिंग्स 218 कॅरेट सोन्यानं तयार करण्यात आले आहेत तसेच 550 पेक्षा जास्त व्हाईट डायमंड आणि रोज कट डायमंड्सचा वापर देखील यामध्ये करण्यात आला आहेत. (photo:shibanidandekar/ig)
7/8

शिबानीची बहिण अनुशा दांडेकर, अभिनेत्री रिया चक्रवर्ती, अभिनेता ह्रतिक रोशन, फरहानची बहिण जोया अख्तर, अमृता अरोरा, जावेद अख्तर आणि शबाना आझमी या सेलिब्रिटींनी फरहान आणि शिबानीच्या लग्नसोहळ्याला हजेरी लावली होती. (photo:shibanidandekar/ig)
8/8

फरहान आणि शिबानीनं 2018 पासून एकमेकांना डेट करण्यास सुरूवात केली. फरहाननं त्याच्या पहिल्या पत्नीसोबत म्हणजेच अधुना भबानीसोबत 2017 साली घटस्फोट घेतला. अधुना आणि फरहाननं 2000 मध्ये लग्नगाठ बांधली होती. (photo:shibanidandekar/ig)
Published at : 25 Feb 2022 02:47 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























