अशा या अभिनेत्रीला सध्या तिच्या भावी आयुष्यासाठी चाहत्यांनी शुभेच्छा देण्यात सुरुवात केली आहे.
2/6
कोरोना काळात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनदरम्यान दिया आणि वैभव यांचं नातं आणखी बहरल्याचं म्हटलं जातं.
3/6
'एबीपी न्यूज़ हिंदी'च्या वृत्तानुसार हा विवाहसोहळा अतिशय कमीत कमी पाहुण्यांच्या उपस्थितीत आणि खासगी स्वरुपात साजरा केला जाणार आहे. दोघांच्याही कुटुंबातील काही खास पाहुण्यांचीच या सोहळ्याला उपस्थिती असेल.
4/6
वैभव आणि दिया एकमेकांचे मित्र होते असंही म्हटलं जातं. वैभव मुंबईतील पाली हिल या उच्चभ्रू भागात राहतो. सूत्रांच्या माहितीनुसार वैभवनं यापूर्वी योगा प्रशिक्षक सुनैना रेखीशी लग्नगाठ बांधली होती. या नात्यातून त्यांना एक मुलगीही असल्याचं म्हटलं जातं.
5/6
मुंबईतच तिच्या विवाहसोहळ्याचे विधी पार पडणार असल्याचं कळत आहे. 15 फेब्रुवारीला दिया व्यावसायिक वैभव रेखी याच्यासह सात जन्मांसाठी एकमेकांची साथ देण्याचं वचनत देत लग्नगाठ बांधणार आहे.
6/6
खासगी जीवनात आलेल्या वादळांचा सामना करणाऱी अभिनेत्री दिया मिर्झा आता पुन्हा एकदा विवाहबंधनात अडकण्यासाठी सज्ज झाली आहे.