एक्स्प्लोर
जीवनात ही घडी अशीच राहू दे... अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांच्या सहजीवनाची 35 वर्ष;जाणून घ्या सदाबहार लव्हस्टोरी
Ashok Saraf and Nivedita Saraf : ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांच्या लग्नाला आज 35 वर्ष पूर्ण झाली आहेत.

निवेदिता सराफ आणि अशोक सराफ यांच्या लग्नाचा आज वाढदिवस आहे.
1/10

डार्लिंग डार्लिंग या नाटकादरम्यान निवेदिता सराफ आणि अशोक सराफ यांची पहिली भेट झाली. त्या नाटकामध्ये निवेदिता यांचे वडील काम करत होते.
2/10

निवेदिता यांना शाळेला सुट्टी असताना त्यांचे वडील गजानन जोशी त्यांना एकदा नाट पाहायला घेऊन गेले. त्यावेळी त्यांची आणि अशोक सराफांची भेट झाली.
3/10

त्यानंतर अनेक वर्षांनी नवरी मिळे नवऱ्याला या सिनेमाच्या निमित्ताने ते दोघे एकत्र आले. या सिनेमात त्या दोघांना एकत्र कोणाताही सीन नव्हता. त्यामुळे शेवटच्या सीनच्या वेळी त्यांची भेट झाली.
4/10

पण सिनेमात निवेदिता सराफ या अशोक सराफ यांच्या बहिण होत्या. याबद्दलचा अनुभव अशोक सराफांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितला होता.
5/10

नवरी मिळे नवऱ्याला या सिनेमानंतर त्यांनी तू सौभाग्यवती हो यामध्ये एकत्र काम केलं. पण तेव्हाही एकमेकांशी काहीही बोलणं झालं नाही.
6/10

त्यांची खरी ओळख ही धुमधडाका सिनेमामुळे झाली. तेव्हा अशोक सराफांनी निवेदिता यांना तुला मनासारखा नवरा मिळू दे असं म्हटलं होतं.
7/10

या सिनेमानंतर त्यांनी मामला पोरींचा हा सिनेमा केला आणि त्यांच्या प्रेमाला सुरुवात झाली.
8/10

त्यानंतर या दोघांनी लग्नगाठ बांधली. पण या दोघांमध्ये तब्बल 18 वर्षांचं अतंर होतं. त्यामुळे निवेदिता यांच्या घरच्यांचा या लग्नाला विरोध होता.
9/10

तसेच सिनेसृष्टीतल्या कोणत्याही कलाकारासोबत निवेदिता यांनी लग्न करु नये अशी त्यांच्या आईची इच्छा होती.
10/10

पण निवेदिता या त्यांच्या निर्णयावर ठाम होत्या. यामध्ये त्यांच्या बहिणीने त्यांना खूप मदत केली आणि त्यांचं लग्न पार पडलं.
Published at : 27 Jun 2024 05:45 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
भारत
क्रीडा
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
