बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अर्जुन कपूरनं (Arjun Kapoor) काही दिवसांपूर्वी त्याच्या 15 महिन्यांच्या फिटनेस ट्रान्सफॉर्मेशनचा फोटो शेअर केला होता. त्याच्या अभिनयाला आणि स्टाईलला नेहमीच प्रेक्षकांची पसंती मिळते.(photo:arjunkapoor/ig)
2/6
नुकत्याच एका मुलाखतीमध्ये अर्जुननं त्याच्या फिटनेस जर्नीबाबत सांगितलं आहे. अर्जुन म्हणाला की, 'त्याला पुन्हा प्रेक्षकांचे प्रेम आणि आदर मिळवायचा आहे.'(photo:arjunkapoor/ig)
3/6
फिटनेस जर्नीबाबत अर्जुन म्हणाला, 'मी माझ्या व्यवसायाचा ऋणी आहे, मी माझे निर्माते आणि माझ्या प्रेक्षकांचा ऋणी आहे. मी काय टायगर श्रॉफ नाहीये. मी त्याचा सारखा व्हायचा प्रयत्न करत नाही. 'अर्जुनने असेही सांगितले की, इंडस्ट्रीत पदार्पण करण्यापूर्वी त्याने काही किलो वजन कमी केले होते. पुढे तो म्हणाला, 'काम सुरू करण्याआधी मी जवळपास 50 किलो वजन कमी केले. माझे वजन आधी 143 किलो होते. नंतर मी ते 93 किलो एवढे कमी केले. पण दहा वर्षांनंतर माझे शरीर बदललं. मला दुखापत, आरोग्यासंबंधित समस्या, कामाचा ताण या समस्या जाणवू लागल्या. पण मी मानसिक दृष्ट्या सक्षम आहे. त्यामुळे 15 महिन्यांमध्ये मी ही फिटनेस जर्नी पूर्ण केली.'(photo:arjunkapoor/ig)
4/6
सध्या अर्जुन हा मनालीमध्ये भूमी पेडणेकरसोबत लेडी किलर या आगामी चित्रपटाचे शूटिंग करत आहे.(photo:arjunkapoor/ig)
5/6
तसेच अर्जुनचा एक व्हीलन रिटर्न्स हा चित्रपट देखील रिलीज होणार आहे. या चित्रपटामध्ये दिशा पटानी, जॉन अब्राहम आणि तारा सुतारिया हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत. अर्जुन कुट्टी हा देखील अर्जुनचा आगामी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आसमान भारद्वाज यांनी केलं आहे.(photo:arjunkapoor/ig)
6/6
अर्जुननं 'इश्कजादे' या चित्रपटामधून अर्जुननं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. अर्जुनच्या गुंडे, तेवर आणि हाफ गर्लफ्रेंड या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.(photo:arjunkapoor/ig)