एक्स्प्लोर
PHOTO : नवाझुद्दीन सिद्दीकीचं मुंबईत आलिशान घर, महालासारखं बंगला पाहिलात का?
Nawazuddin Siddiqui bunglow mumbai
1/8

नवाझुद्दीन सिद्दीकीने सुरवातीच्या काळात सिनेमे मिळत नसताना पडेल ते काम केलं. पण आज एक यशस्वी अभिनेता झाल्यानंतर मुंबईत एक आलिशान घर (Nawazuddin Luxurious Home) बनवलं आहे. (P.C. nawazuddin siddiqui instagram)
2/8

महालासारख्या वाटणाऱ्या या बंगल्याचे फोटो नवाझुद्दीनने त्याच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. (P.C. nawazuddin siddiqui instagram)
3/8

काही दिवासांपूर्वीच मुंबईतील नवाझुद्दीनच्या घराचं काम पूर्ण झालं असून या त्याच्या बंगल्यापुढे एक सुंदर गार्डन देखील आहे. (P.C. nawazuddin siddiqui instagram)
4/8

नवाझुद्दीनने नुकत्याच शेअर केलेल्या फोटोमध्ये तो या गार्डनमध्ये एका खुर्चीवर बसून कोणतंतरी पुस्तक वाचताना दिसत आहे. (P.C. nawazuddin siddiqui instagram)
5/8

दरम्यान नवाझुद्दीनने या घराचं काम करवून घेतना त्याच्या जुन्या घराच्या इंटीरियरची प्रेरणा घेऊन हे घरं तयार करवून घेतलं आहे. (P.C. nawazuddin siddiqui instagram)
6/8

विशेष म्हणजे नवाझुद्दीनने या घराचं नाव त्याच्या वडिलांच्या आठवणीत 'नवाब' असं ठेवलं आहे. (P.C. nawazuddin siddiqui instagram)
7/8

नवाझुद्दीन त्याच्या घराबाहेरील गार्डनमध्ये फोटोशूट करुन हे फोटो बऱ्याचदा शेअर करताना दिसत असतो. (P.C. nawazuddin siddiqui instagram)
8/8

सध्याच्या घडीला नवाझुद्दीन हिंदीतील एक आघाडीचा अभिनेता असून त्याचे आगामी सिनेमे लवकरच प्रदर्शित होणार असून त्याचा चाहतावर्ग सिनेमांची आतुरतेने वाट पाहत आहे. (P.C. nawazuddin siddiqui instagram)
Published at : 27 Jan 2022 11:37 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
राजकारण
महाराष्ट्र
मुंबई






















