एक्स्प्लोर
uorfi Javed: 10 सिंगल तरुण-तरुणी, 240 तास एकत्र राहणार, प्रेम, धोका अन् बरंच काही; उर्फी जावेदचा 'रोका या धोका' शो आहे तरी काय?
uorfi Javed: इंटरनेटवर वारंवार आपल्या लुकने चर्चेत असलेली उर्फी जावेद हीने साखरपुडा केला आहे का अशा चर्चा सध्या सुरू आहेत.

uorfi Javed
1/7

आपल्या खास फॅशन सेन्समुळे नेहमीच चर्चेत राहणारी उर्फी जावेद पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी तिचं चर्चेत येण्याचं कारण तिचा ड्रेस नसून काही व्हायरल होत असलेले फोटो हे कारण आहे. वास्तविक, उर्फी जावेदचे एका मिस्ट्री मॅनसोबतचे काही फोटो इंटरनेटवर व्हायरल होत आहेत, जे साखरपुडा केल्यासारखे वाटतात. यानंतर उर्फीचा साखरपुडा झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. जाणून घेऊया या व्हायरल फोटोंबद्दलचं सत्य?
2/7

उर्फी जावेदच्या एका फोटोने इंटरनेटवर खळबळ उडवून दिली आहे. फोटोमध्ये एक मिस्ट्री मॅन गुडघ्यावर बसून उर्फी जावेदला अंगठी घालताना दिसत आहे. हे चित्र एका साखरपुडा फंक्शनचे असल्याचे दिसते आहे.
3/7

त्यानंतर सोशल मीडियावर उर्फीच्या साखरपुड्याची चर्चा रंगली असून सोशल मीडियातील खळबळ उडाली आहे, तिने गुपचूप गुपचूप साखरपुडा उरकला आहे का, की, एखादा स्टंट आहे, की आणखी काही ट्विस्ट आहे का, असा अंदाज बांधला जात आहे.
4/7

उर्फीच्या रिंग सेरेमनीचा फोटो व्हायरल होताच चाहत्यांनी सोशल मिडियावर तिचं अभिनंदन करण्यास सुरुवात केली. काहींनी मिस्ट्री मॅनचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. तर काहींनी याला उर्फीचा पब्लिसिटी स्टंट म्हटलं आहे. मात्र, साखरपुड्याच्या अफवा पसरल्यानंतर उर्फीने स्वतः व्हायरल झालेल्या फोटोबाबत सत्य सांगितले आहे. उर्फीने तिच्या इंस्टा अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करून तिच्या साखरपुड्याच्या सोहळ्याच्या फोटोंबद्दल सत्य सांगितले आहे.
5/7

तिच्या इन्स्टा अकाऊंटवर पोस्ट करत उर्फीने लिहिले की, "हे प्रेम सोपे नाही, फक्त हे समजून घ्या की फसवणूक होण्याचा धोका आहे, तुम्हाला थांबून लग्न जमवावे लागेल. हॅशटॅगने 14 फेब्रुवारीपासून डिस्ने + हॉटस्टारवर रोका या धोखा.
6/7

म्हणजेच हा फोटो उर्फीच्या आगामी शोचा आहे. ज्यामध्ये ती होस्टच्या भूमिकेत दिसणार आहे. या शोमध्ये 10 सिंगल लोक 240 तास एकत्र घालवतील.शो मध्ये त्यांची कंपेटिबिलिटी, कम्यूनिकेशन आणि कॉम्प्रोमाइज हे तपासले जाईल.
7/7

व्हायरल फोटोंमध्ये उर्फीसोबत दिसणारा मिस्ट्री मॅन दुसरा कोणी नसून कॉमेडियन हर्ष गुजराल आहे. जो उर्फीसोबत शोचा सह-होस्ट आहे. आता हा शो पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
Published at : 14 Feb 2025 01:38 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पालघर
अकोला
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
