रांगोळी काढण्यासाठी केवळ रांगोळी आणि रंगांचाच नाहीतर तुम्ही फुला-पानांचाही वापर करू शकता. फुलं पानं वेगवेगळ्या डिझाइन्समध्ये मांडून तुम्ही सुंदर रांगोळी तयार करू शकता.
2/8
सुरेख रांगोळीभोवती पण्यत्यांची आरास केल्यावर रांगोळीची शोभा आणखी वाढते.
3/8
रांगोळीमध्येही अनेक प्रकार आहेत. त्या प्रकारांनुसार ती काढण्याची पद्धतही वेगवेगळी आहे. ठिपक्यांची रांगोळी, संस्कार भारती रांगोळी यांसारख्या रांगोळ्यांसोबतच तुम्ही वेगवेगळ्या डिझाइन्सच्याही रांगोळ्या काढू शकता.
4/8
रांगोळी काढणं तसं पाहायला गेलं तर फारसं सोपंही नाही. पण या डिझाइन्सच्या मदतीने तुम्हीही तुमच्या अंगणात सुंदर रांगोळी काढू शकता.
5/8
दिवाळीत आकाश कंदील, फराळ, पणत्यांची आरास आणि रोषणाईसोबत रांगोळीही तितकीच महत्त्वाची असते.
6/8
दारात किंवा अंगणात काढलेली सुंदर आणि सुरेख रांगोळी लोकांचं लक्षं आकर्षित करते. काही खास रांगोळीच्या डिझाइन्स...
7/8
दिवाळी निमित्त अंगणात किंवा दारासमोर रांगोळी काढली जाते. अशातच तुम्हीही जर ट्रेंडि रांगोळीच्या शोधात असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी काही खास रांगोळीच्या डिझाइन्स घेऊन आलो आहोत.
8/8
देशभरात कोरोनाच्या प्रार्दुर्भावात दिवाळी साजरी केली जात आहे. अशातच दिवाळी साधेपणाने साजरी केली जात असली तरी उत्साह मात्र तोच आहे.