एक्स्प्लोर
Nikki Yadav Case : निक्की यादव प्रकरणात मोठी अपडेट, निक्की आणि साहिल नवरा-बायको, कुटुंबीयांनीच रचला हत्येचा कट
Delhi Nikki Yadav Murder Case : निक्की यादव प्रकरणात दिल्ली पोलिसांनी साहिलच्या वडीलांसह पाच जणांना अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे तीन वर्षापूर्वी साहिल आणि निक्कीचं लग्न झालं होतं.
![Delhi Nikki Yadav Murder Case : निक्की यादव प्रकरणात दिल्ली पोलिसांनी साहिलच्या वडीलांसह पाच जणांना अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे तीन वर्षापूर्वी साहिल आणि निक्कीचं लग्न झालं होतं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/15/a0a615fa35fd074db9d56de768db4e831676457585644367_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Nikki Yadav Murder Case Update Nikki and Sahil was married
1/11
![Nikki Yadav and Sahil Gehlot as Married : दिल्लीतील निक्की यादव (Nikki Yadav) हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. मृत निक्की यादव आणि आरोपी साहिल गेहलोत (Sahil Gehlot) हे नवरा-बायको होते, हे पोलीस तपासात उघड झालं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/18/759f1494280c2d4da6fc6c12b67b1e2c77529.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Nikki Yadav and Sahil Gehlot as Married : दिल्लीतील निक्की यादव (Nikki Yadav) हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. मृत निक्की यादव आणि आरोपी साहिल गेहलोत (Sahil Gehlot) हे नवरा-बायको होते, हे पोलीस तपासात उघड झालं आहे.
2/11
![मिळालेल्या माहितीनुसार, निक्की आणि साहिल यांचं तीन वर्षापूर्वीचं लग्न झालं होतं. मात्र, साहिलने तपास भरकटवण्यासाठी या प्रकरणाला लिव्ह-इन सांगितल्याचं समोर आलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/18/db280650e1a9a58e3b3aef2a535c09ba67883.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मिळालेल्या माहितीनुसार, निक्की आणि साहिल यांचं तीन वर्षापूर्वीचं लग्न झालं होतं. मात्र, साहिलने तपास भरकटवण्यासाठी या प्रकरणाला लिव्ह-इन सांगितल्याचं समोर आलं आहे.
3/11
![निक्कीच्या हत्येत साहिलच्या कुटुंबाचा हात असल्याचा आरोप निक्कीच्या वडिलांनी केला आहे. दिल्ली पोलिसांनी साहिलच्या वडिलांसह पाच जणांना अटक केली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/18/7f62368afdac68f9ce438953c4c8211040274.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
निक्कीच्या हत्येत साहिलच्या कुटुंबाचा हात असल्याचा आरोप निक्कीच्या वडिलांनी केला आहे. दिल्ली पोलिसांनी साहिलच्या वडिलांसह पाच जणांना अटक केली आहे.
4/11
![निक्कीच्या हत्येच्या आरोपाखाली साहिलच्या वडिलांसह पाच जणांना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. दिल्ली पोलिसांनी साहिल गेहलोत आणि निक्की यादव यांच्या लग्नाचं प्रमाणपत्रही जप्त केलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/18/987ac8059685a40a11b9530d8f3b860b5dded.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
निक्कीच्या हत्येच्या आरोपाखाली साहिलच्या वडिलांसह पाच जणांना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. दिल्ली पोलिसांनी साहिल गेहलोत आणि निक्की यादव यांच्या लग्नाचं प्रमाणपत्रही जप्त केलं आहे.
5/11
![दिल्लीतील निक्की यादव या तरुणीची लिव्ह-इन पार्टनर साहिल गेहलोत यानं हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. मात्र आता या प्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/18/c37b1f551fea32bdced67d2421ff9c3f41447.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दिल्लीतील निक्की यादव या तरुणीची लिव्ह-इन पार्टनर साहिल गेहलोत यानं हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. मात्र आता या प्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे.
6/11
![दिल्ली पोलिसांना सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, साहिल गेहलोत आणि निक्की यादव यांचं ऑक्टोबर 2020 मध्ये नोएडा येथील आर्य समाज मंदिरात लग्न झालं होतं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/18/8bb95f7e900e5a3b89a7b72115793df5a2aae.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दिल्ली पोलिसांना सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, साहिल गेहलोत आणि निक्की यादव यांचं ऑक्टोबर 2020 मध्ये नोएडा येथील आर्य समाज मंदिरात लग्न झालं होतं.
7/11
![साहिलचे कुटुंब या लग्नाच्या विरोधात, त्यामुळे त्यांना निक्कीचा काटा काढायचा होता. म्हणून साहिलच्या कुटुंबीयांनी डिसेंबर 2022 मध्ये साहिलचं दुसऱ्या तरुणीसोबत लग्न ठरवलं होतं आणि साहिलचं आधीच लग्न झाल्याचं त्या मुली आणि तिच्या घरच्यांपासून लपवून ठेवले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/18/1804454d8b328bad3beb8e00c3b9201e11fcc.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
साहिलचे कुटुंब या लग्नाच्या विरोधात, त्यामुळे त्यांना निक्कीचा काटा काढायचा होता. म्हणून साहिलच्या कुटुंबीयांनी डिसेंबर 2022 मध्ये साहिलचं दुसऱ्या तरुणीसोबत लग्न ठरवलं होतं आणि साहिलचं आधीच लग्न झाल्याचं त्या मुली आणि तिच्या घरच्यांपासून लपवून ठेवले.
8/11
![दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेनेही शनिवारी मोठी कारवाई करत निक्कीच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी साहिलचे वडील, भाऊ आणि मित्रासह पाच जणांना अटक केली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/18/5c4728af5a6d6a9ce534dad1decefde4f5dd7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेनेही शनिवारी मोठी कारवाई करत निक्कीच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी साहिलचे वडील, भाऊ आणि मित्रासह पाच जणांना अटक केली.
9/11
![क्राइम ब्रँचचे स्पेशल पोलीस आयुक्त रविंदर यादव यांनी सांगितलं की, साहिल गेहलोतची पोलीस कोठडीत चौकशी करण्यात आली होती, ज्यामध्ये त्यानं सांगितलं की, निक्कीच्या हत्येचा संपूर्ण कट त्याच्या कुटुंबियांनी मिळून आखला होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/18/a0e1c23d1c1f19bc7c55c7dc6348d1782d783.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
क्राइम ब्रँचचे स्पेशल पोलीस आयुक्त रविंदर यादव यांनी सांगितलं की, साहिल गेहलोतची पोलीस कोठडीत चौकशी करण्यात आली होती, ज्यामध्ये त्यानं सांगितलं की, निक्कीच्या हत्येचा संपूर्ण कट त्याच्या कुटुंबियांनी मिळून आखला होता.
10/11
![यामध्ये साहिलचे त्याचे वडील, दोन चुलत भाऊ आशिष आणि नवीन यांच्यासह अमर आणि लोकेश हे दोन मित्र सामील होते. हत्येनंतर सर्वजण साहिलच्या लग्नाला एकत्र पोहोचले होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/18/61b1ce277c95dc8bda3f9530c391fc2bfb988.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यामध्ये साहिलचे त्याचे वडील, दोन चुलत भाऊ आशिष आणि नवीन यांच्यासह अमर आणि लोकेश हे दोन मित्र सामील होते. हत्येनंतर सर्वजण साहिलच्या लग्नाला एकत्र पोहोचले होते.
11/11
![दिल्लीतील 22 वर्षीय तरुणी निक्की यादव हिची तिचा लिव्ह-इन पार्टनर याने हत्या केली. त्यानंतर तिचा मृतदेह फ्रिजमध्ये लपवून हत्येनंतर अवघ्या काही तासाने त्याने दुसऱ्या तरुणीशी लग्न केलं. साहिल लग्न करणार असल्याचं समजताच निक्कीने त्याला याबाबत विचारलं. यावरूनच दोघांमध्ये वाद झाला. साहिलनं निक्कीला फिरण्यासाठी बोलावलं आणि रागाच्या भरात गाडीतच मोबाईल केबलने गळा दाबून निक्कीची हत्या केली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/18/59f5f64b192779d882a9aeb845867402fd96b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दिल्लीतील 22 वर्षीय तरुणी निक्की यादव हिची तिचा लिव्ह-इन पार्टनर याने हत्या केली. त्यानंतर तिचा मृतदेह फ्रिजमध्ये लपवून हत्येनंतर अवघ्या काही तासाने त्याने दुसऱ्या तरुणीशी लग्न केलं. साहिल लग्न करणार असल्याचं समजताच निक्कीने त्याला याबाबत विचारलं. यावरूनच दोघांमध्ये वाद झाला. साहिलनं निक्कीला फिरण्यासाठी बोलावलं आणि रागाच्या भरात गाडीतच मोबाईल केबलने गळा दाबून निक्कीची हत्या केली.
Published at : 18 Feb 2023 01:15 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
ऑटो
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)