एक्स्प्लोर
Rupee Vs Dollar: चिंता वाढणार? डिसेंबरपर्यंत रुपया 84.50 पर्यंत घसरण्याची शक्यता
रुपयात आणखी घसरण होणे अपेक्षित आहे. डिसेंबर अखरेपर्यंत डॉलरच्या तुलनेत रुपया 84.50 पर्यंत घसरण्याची शक्यता आहे.

Rupee Vs Dollar: चिंता वाढणार? डिसेंबरपर्यंत रुपया 84.50 पर्यंत घसरण्याची शक्यता
1/10

डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
2/10

डॉलरच्या तुलनेत रुपयाची आणखी घसरण होण्याची शक्यता आहे.
3/10

डिसेंबरपर्यंत रुपया 84.50 च्या पातळीवर पोहोचू शकतो असं बँकर्स आणि अर्थतज्ज्ञांनी म्हटले आहे.
4/10

'रॉयटर्स'ने केलेल्या एका सर्वेक्षणातून डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया आणखी घसरण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
5/10

देशांतर्गत व्यापार संतुलन आणि अमेरिकेतील व्याजदरात झालेली वाढ यामुळे गेल्या नऊ वर्षांतील सर्वात मोठी घसरण रुपयात झाली आहे.
6/10

'रॉयटर्स' च्या सर्वेक्षणात 14 बँकर्स आणि विदेशी चलन तज्ञांनी सर्वेक्षणात अंदाज व्यक्त केला आहे. डिसेंबरपर्यंत रुपया 84.50 पर्यंत घसरण्याची शक्यता आहे.
7/10

चलनवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अमेरिकन फेडरल रिझर्व्हने व्याजदरात आक्रमक वाढ केली आहे.
8/10

फेडरल रिझर्व्हने केलेल्या व्याज दरवाढीमुळे डॉलरचा निर्देशांक 18 टक्क्यांनी वधारला आहे.
9/10

रुपया कमकुवत झाल्याने परकीय चलनाच्या साठ्यावर परिणाम होतो. रुपयाची होणारी घसरण थांबवण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडून डॉलरची विक्री करण्यात येते. त्यामुळे परकीय गंगाजळ कमी होते.
10/10

रुपया कमकुवत झाल्याने आयात महाग होते. त्याचा थेट परिणाम येथील सर्वसामान्यांवर होतो.
Published at : 21 Oct 2022 09:04 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
सांगली
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
