एक्स्प्लोर
MG Astor Photos :भारतातील पहिल्या पर्सनल एआय असिस्टंट एसयूव्ही 'अॅस्टर'चे अनावरण
Feature_Photo_4
1/8

एमजी मोटर इंडियाने वैयक्तिक एआय असिस्टंट आणि फर्स्ट-इन-सेगमेंट ऑटोनॉमस (लेव्हल 2) तंत्रज्ञानासह भारतातील पहिली एसयूव्ही एमजी ॲस्टर बाजारपेठेत दाखल केली. एमजी ॲस्टर 19 सप्टेंबरपासून एमजी शोरूममध्ये दिसेल आणि त्यानंतर लवकरच बुकिंगला सुरुवात होईल.
2/8

सॉफ्ट-टच आणि प्रीमियम मटेरियलसह इंटिरिअर सुबक कलाकुसरीने तयार केले गेले आहे. हे दोन इंजिन पर्यायांमध्ये येणार आहेत - ब्रिट डायनॅमिक 220 टर्बो पेट्रोल इंजिन ज्यात 6-स्पीड एटी आहे जे तब्बल 220 एनएम टॉर्क आणि 140 पीएस पॉवर देते आणि दुसरे - मॅन्युअल ट्रान्समिशनसह व्हीटीआय टेक पेट्रोल इंजिन आणि 8-स्पीड सीव्हीटी, 144 एनएम टॉर्क आणि 110 पीएस पॉवर देते.
3/8

एमजी ॲस्टरच्या वैयक्तिक एआय असिस्टंटमध्ये मानवासारख्या भावना आणि आवाजाची वैशिष्ट्ये जोडली आहेत. पॅरालिम्पिक ॲथलिट दीपा मलिकने वैयक्तिक एआय सहाय्यकाला आपला आवाज दिला आहे, ज्याद्वारे हा अनुभव वैयक्तिक पातळीवर सुलभ होईल.
4/8

ॲस्टरमधील एआय तंत्रज्ञान एमजीच्या संभाव्यतेच्या कार-एज-ए-प्लॅटफॉर्म (सीएएपी) च्या दृष्टीकोनाभोवती विकसित केले गेले आहे, ज्यामुळे वापरकर्त्यांना त्यांच्या गरजेनुसार सेवा अंगीकृत करणे शक्य होईल.
5/8

एमजीने एस्टरमधील एडीएएस (अॅडव्हान्स ड्रायव्हर-असिस्टन्स सिस्टम) साठी बॉशबरोबर भागीदारी केली आहे. एआय तंत्रज्ञान, सहा रडार आणि पाच कॅमेरे एसयूव्हीला 14 अॅडव्हान्स ऑटोनॉमस लेव्हल 2 वैशिष्ट्ये व्यवस्थापित करण्यासाठी सुसज्ज करतात.
6/8

ही कार ईएसपी, टीसीएस आणि एचडीसी सारख्या 27 मानक सुरक्षा वैशिष्ट्यांसह सुरक्षित ड्रायव्हिंग अनुभव सुनिश्चित करते. त्याच्या आराम, सुविधा आणि सुरक्षा वैशिष्ट्यांमध्ये 6 एअरबॅग्स, 6-वे पॉवर-ॲडजस्टेबल ड्रायव्हर सीट, इलेक्ट्रिक पार्किंग ब्रेक, गरम ओआरव्हीएम, रेन-सेन्सिंग वायपर, पीएम 2.5 फिल्टर, पॅनोरॅमिक स्काय रूफ, रिअर एसी व्हेंट आणि फ्रंट आणि रिअर आर्मरेस्ट, 10.1 इंच एचडी इन्फोटेनमेंट सिस्टम आणि 7 इंच एम्बेडेड एलसीडी स्क्रीनसह पूर्ण डिजिटल क्लस्टर यांचा समावेश आहे.
7/8

एस्टरमध्ये एमजी आय-स्मार्ट तंत्रज्ञानावरील 80+ इंटरनेट वैशिष्ट्ये आहेत. त्याच्या वर, सीएएपी (कार एज ए प्लॅटफॉर्म) आहे, एमजी ॲस्टर सबस्क्रिप्शन आणि सेवा आयोजित करते, ज्यात मॅपमायइंडियासह नकाशे आणि नेव्हिगेशन, जिओ कनेक्टिव्हिटी, कोयनेर्थ द्वारे अशा प्रकारचे पहिले ब्लॉकचेन-संरक्षित वाहन डिजिटल पासपोर्ट आणि बरेच काही समाविष्ट आहे.
8/8

एमजी कार मालकांना जिओ साव्हन ॲपवर संगीताची मैफल रंगविता येईल, तसेच हेड युनिटद्वारे पार्किंग स्लॉट सर्व्ह करण्याचे या प्रकारातील-पहिले वैशिष्ट्य अनुभवता येईल (पार्क+द्वारे संचालित, सुरुवातीस निवडक शहरे) आणि विकिपीडियासह माहितीच्या खजिन्यात अमर्याद भटकता येईल.
Published at : 15 Sep 2021 11:35 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























