एक्स्प्लोर
Adani Stocks : अमेरिकन शेअर बाजारात अदानींना झटका; डाऊ जोन्स सस्टेनेबिलिटी इंडेक्समधून बाहेर, गौतम अदानी श्रीमंतांच्या टॉप-20 यादीतूनही घसरले
Gautam Adani Net Worth Fall : अदानी समुहाला गेल्या दिवसांपासून मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अदानी समुहाचे शेअर्स (Adani Group Shares) शुक्रवारी (3 फेब्रुवारी) सलग सातव्या दिवशी घसरले आहेत.
Gautam Adani Stocks Loss Net Worth Fall
1/14

अदानी समुहाचे शेअर्स (Adani Group Shares) शुक्रवारी (3 फेब्रुवारी) सलग सातव्या दिवशी घसरले आहेत. या घसरणीमुळे गुंतवणूकदारांमध्ये खळबळ उडाली आहे.
2/14

आठवड्याच्या शेवटच्या दिवशी 3 फेब्रुवारी रोजी कंपनीचे शेअर्स लोअर सर्किटमध्ये आहेत. चालू आठवड्यात गेल्या पाच दिवसांमध्ये अदानी शेअर्स 66 टक्क्यांनी घसरले आहेत.
3/14

गौतम अदानी यांच्या संपत्तीमध्येही मोठी घसरण झाली आहे. नवीन रिपोर्टनुसार, गौतम अदानी श्रीमंतांच्या टॉप-20 मधून बाहेर गेले आहेत.
4/14

दरम्यान, नॅशनल स्टॉक एक्स्चेंजने (NSE - National Stock Exchange) अदानी समूहावर (Adani Group) करडी नजर आहे. NSE ने अदानी समूहाचे (Adani Group) तीन शेअर्स देखरेखीखाली ठेवले आहेत.
5/14

शेअर बाजारातील अस्थिरता रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. अदानी समुहाच्या अदानी एंटरप्रायझेस, अदानी पोर्ट्स आणि अंबुजा सिमेंट्स या शेअर्सवर अतिरिक्त पाळत ठेवण्याच्या उपाययोजना (ASM) अंतर्गत करण्यात आल्या आहे.
6/14

गौतम अदानी यांच्या संपत्तीतही मोठी घट झाली आहे. हिंडनबर्ग अहवालानंतर अदानींच्या संपत्तीत मोठी घसरण झाली आहे.
7/14

ताज्या आकडेवारीनुसार, आता गौतम अदानी जगातील श्रीमंतांच्या टॉप-20 च्या बाहेर पडले असून ब्लूमबर्ग बिलेनियर्स इंडेक्समध्ये (Bloomberg Billionaires Index) अदानी आता 22 व्या क्रमांकावर आहेत.
8/14

आज शुक्रवारी 3 फेब्रुवारी रोजी अदानी कंपनीचे शेअर्स लोअर सर्किटमध्ये आहेत. गेल्या 5 दिवसांत अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स 66 टक्क्यांनी घसरले आहेत.
9/14

NSE ने अदानी समुहाचं स्टॉक्सचे मॉनिटरिंग वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे इंट्राडे ट्रेडिंगसाठी देखील 100 टक्के अपफ्रंट मार्जिन आवश्यक असेल आणि यामुळे शॉर्ट सेलिंगला आळा बसेल.
10/14

NSE ने ASM फ्रेमवर्क (Additional Surveillance Measure) म्हणजे अतिरिक्त पाळत ठेवण्याच्या उपायोजनांमध्ये अदानी ग्रुपचे तीन शेअर्स ठेवले आहेत.
11/14

अदानींची संपत्ती आता 61.3 अब्ज डॉलरवर घसरली आहे. गेल्या 24 तासांत अदानींना 10.7 अब्ज डॉलरचं नुकसान झालं आहे.
12/14

आता अदानी समुहाला अमेरिकन शेअर बाजारातून झटका बसला आहे. अदानी समुहाची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेसला डाऊ जोन्स सस्टेनेबिलिटी इंडेक्समधून काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स 7 फेब्रुवारीपासून डाऊ जोन्स सस्टेनेबिलिटी इंडेक्समध्ये व्यापार करणार नाही.
13/14

गेल्या दोन आठवड्यांपासून अदानी समुहातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. यामुळे अनेक वेळा शेअर्सवर लोअर सर्किट लागलं.
14/14

अदानी कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याने त्याच्या एकूण संपत्तीतही सातत्याने घट होत आहे.
Published at : 03 Feb 2023 03:16 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement



















