एक्स्प्लोर
'हे' तीन स्टॉक 15 दिवसात तुम्हाला करणार मालामाल? जाणून घ्या स्टॉप लॉस अन् टार्गेट!
हे तीन स्टॉक तुम्हाला आगामी काळात चांगले रिटर्न्स देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आगामी 15 दिवसांसाठी गुंतवणूक करण्याचा सल्ला ब्रोकरेज फर्मने दिला आहे.

best stock to invest (फोटो सौजन्य- एबीपी नेटवर्क)
1/5

Axis Direct Top 5 Postional Stocks: अॅक्सिस डायरेक्ट (Axis Direct) या ब्रोकरेज फर्मने पोजिशनल ट्रेडर्ससाठी आगामी 15 दिवसांसाठी एकूण 4 शेअर्स गुंतवणुकीसाठी सुचवले आहेत.
2/5

यातील पहिला स्टॉक हा Fortis Healthcare असून Axis Direct ने या शेअरला खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. त्यासाठी एंट्री प्राईज 680 रुपये तर टार्गेट प्राईज 750 रुपये प्रति शेअर सुचवले आहे. स्टॉप लॉस 638 ठेवायला हवा तसेच 5-30 दिवसांच्या कालावधीसाठी यात गुंतवणूक करण्याचा सल्ला अॅक्सिस ब्रोकरेज फर्मने दिला आहे. हा शेअर आगामी काळात 10 टक्क्यांनी वर जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
3/5

Linc या कंपनीतही गुंतवणूक करण्याचे Axis Direct ने सूचवले आहे. त्यासाठी एंट्री प्राईस 194.50 - 196.25 रुपये आणि टार्गेट प्राईज 215 रुपये प्रति शेअर आणि स्टॉप लॉस 190 रुपये ठेवण्याचा सल्ला दिला आहे. 01 ते 15 दिवसांसाठी ही गुंतवणूक करावी असं ब्रोकरेज फर्मने म्हटले असून ही कंपनी आगामी काळात 12 टक्क्यांपर्यंत रिटर्न्स देण्याची शक्यता आहे.
4/5

Graphite India या कंपनीतही गुंतवणूक करण्याच Axis Direct ने सूचवलं आहे. त्यासाठी एंट्री प्राईस 564 - 569 रुपये, टार्गेट प्राईस 611 रुपये प्रति शेअर तर स्टॉप लॉस 555 रुपये ठेवावेत, असे या ब्रोकरेज फर्मने सुचवले आहे. त्यासाठी टाईम फ्रेम 01-15 दिवासांची दिली आहे.
5/5

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
Published at : 22 Dec 2024 03:04 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
भारत
शेत-शिवार
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
