एक्स्प्लोर
6 रुपयांपेक्षा कमी किमतीचा शेअर, पण तीन दिवसांपासून लागतेय अपर सर्किट; अनेकांना केलं मालामाल!
सध्या शेअर बाजारात चढउतार पाहायला मिळत आहे. अनेक कंपन्या वित्त वर्ष 2024-25 मधील दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर करत आहेत.

Shah Metacorp Ltd (फोटो सौजन्य- META AI)
1/5

स्टेनलेस स्टील प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरिंग करणारी Shah Metacorp Ltd ही कंपनी गेल्या तीन दिवसांपासून चांगली कामगिरी करत आहे. या कंपनीला गेल्या तीन दिवसांपासून अपर सर्किट लागत आहे.
2/5

या कंपनीने वित्तवर्ष 2024-25 मध्ये दुसऱ्या तिमाहीत दमदार नफा नोंदवला आहे. या कंपनीला दुसऱ्या तिमाहीत आपल्या नफ्यात 225 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. त्यामुले या पेनी स्टॉकमध्ये सध्या वाढ झालेली पाहायला मिळत आहे. सध्या हा स्टॉक 3.62 वाढीसह 5.44 रुपयांवर पोहोचला आहे.
3/5

ही कंपनी स्टेनलेस स्टिल, माईल्ट स्टिलची निर्मिती करते. या कंपनीची उत्पादनं ट्रान्समिशन लाईन टॉवर्स, टेलिकॉम टॉवर, वायू उर्ज क्षेत्रात लागणार उपकरणे तयार करते.
4/5

शाह मेटाकॉर्प लिमिटेड या कंपनीने 2024-25 च्या दुसऱ्या तिमाहीत 48.54 कोटी रुपयांचा महसूल मिळवला. हा महसूल 21.33 कोटी रुपयांच्या तुलनेत 128 टक्क्यांनी जास्त आहे. या कंपनीचा निव्वळ नफा 2.47 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. नफ्यात वाढ झाल्यामुळे सध्या या कंपनीत गुंतवणूकदार चांगले पैसे गुंतवत आहेत.
5/5

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
Published at : 19 Oct 2024 02:45 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
भारत
सांगली
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
