एक्स्प्लोर
Best Mileage CNG cars : इंधन दरवाढीतही सर्वसामान्यांना परवडणाऱ्या बेस्ट CNG कार
Cars
1/5

पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरामुळे सर्वजण चिंतेत आहेत. इंधनाच्या वाढत्या दरामुळे गाडी फिरवणे देखील महाग झालं आहे. त्यात अनेक जण नवीन कार खरेदी करण्याच्या विचारात आहेत मात्र पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे द्विधा मन:स्थितीत आहेत. अशांसाठी इलेक्ट्रिक आणि सीएनजी कार असे दोन पर्यात समोर आहेत. इलेक्ट्रिक कार थोड्या महाग आहेत. अशा परिस्थितीत, सर्वोत्तम पर्याय म्हणजे सीएनजी कार. सीएनजी कार पेट्रोल किंवा डिझेल वाहनांपेक्षा जास्त मायलेज देतात. तसेच फार कमी प्रदूषण करतात. आज टॉप सीएनजी कारबद्दल जाणून घेऊयात.
2/5

मारुती सुझुकी सेलेरियो (Maruti Suzuki Celerio) : पेट्रोल इंजिन व्यतिरिक्त, मारुती सुझुकी सेलेरियो सीएनजी प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. या कारमध्ये सीएनजी हॅचबॅक 1.0-लिटर इंजिन आहे जे 57 पीएस पॉवर आणि 78 एनएम टॉर्क जनरेट करते. हे सीएनजी मॉडेल 30.47 किमी/किलोचे मायलेज देते. सीएनजी व्हेरिएंट VXI आणि VXI (O) ट्रिम्समध्ये उपलब्ध आहेत. या कारची सुरुवातीची किंमत 5,95,000 रुपये आहे.
Published at : 31 Aug 2021 10:31 PM (IST)
आणखी पाहा























