वाढदिवसानिमित्त आज त्यांच्यावर बॉलिवूड, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांसह चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
2/11
लता मंगेशकर यांचा जन्म 28 सप्टेंबर 1929 मध्ये झाला.लता मंगेशकरांचे कुटुंब संगीतासाठी प्रसिद्ध असून, सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले, उषा मंगेशकर, मीना मंगेशकर आणि ख्यातनाम संगीतकार-गायक हृदयनाथ मंगेशकर ही त्यांची सख्खी भावंडे आहेत.
3/11
लता मंगेशकर यांनी आपली वेगळी ओळख निर्माण करत हिंदी, मराठीसह अनेक भाषांमध्ये रसिकांच्या मनावर आपले नाव कोरले.
4/11
त्यांच्या नावे गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये देखील विक्रम नोंदलेले आहेत. 1974 ते 1991 च्या कालावधीत सर्वात जास्त रेकॉर्डिंग्सचा विक्रम त्यांनी केला.
5/11
6/11
7/11
बॉलिवूडसह देशविदेशातील विविध भाषांतील गाण्यांना आपल्या मोहक आवाजाने स्वरबद्ध करणाऱ्या लतादिदी आज 91 वर्षांच्या झाल्या आहेत.
8/11
2001 साली त्यांना 'भारतरत्न' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
9/11
लता मंगेशकरांच्या कारकिर्दीची सुरुवात 1942 मध्ये झाली आणि ती कारकीर्द सहा दशकांपेक्षा अधिक काळ टिकून आहे. त्यांनी हजारहून अधिक हिंदी चित्रपटांची गाणी गायली आहेत.
10/11
लता मंगेशकर अर्थात लतादिदींनी आपल्या जादुई आवाजाच्या जोरावर 'गानकोकिळा' अशी बिरुदावली आपल्या नावासमोर मिळवली.
11/11
भारताचा आवाज अशी ओळख असलेल्या गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांचा आज वाढदिवस.