एक्स्प्लोर
Weekly Horoscope : सर्व 12 राशींसाठी नवीन आठवडा कसा राहील? जाणून घ्या साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope 17 June To 23 June 2024 : नवीन आठवडा काही राशींसाठी चांगला ठरेल, तर काही राशींना या काळात नुकसान सहन करावं लागेल. सर्व राशींसाठी नवीन आठवडा कसा राहील? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.
Weekly Horoscope 17 June To 23 June 2024
1/12

मेष राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा खास असणार आहे. या काळात तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडताना दिसतील. तुम्ही या आठवड्यात कुटुंबीय किंवा मित्रांबरोबर बाहेर फिरायला जाण्याचा बेत आखू शकता. तुमची अनेक दिवसांपासून रखडलेली कामं पूर्ण होतील.
2/12

मीन राशीच्या लोकांसाठी नवा आठवडा शुभ राहील. या आठवड्यात तुम्हाला करिअर आणि व्यवसायासाठी प्रवास करावा लागू शकतो. तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर मित्राच्या मदतीने तुमची समस्या सोडवली जाऊ शकते. पैशाचा ओघ वाढेल. व्यवसायात भागीदार येऊ शकतो. तुमच्या प्रियकराशी तुमचे संबंध चांगले राहतील.
3/12

या आठवड्यात कुंभ राशीच्या लोकांची नियोजित कामं पूर्ण होतील. तुमची उर्जा पातळी चांगली असेल. करिअर आणि व्यवसायात प्रगती करण्याची संधी मिळेल. तुमचे मित्र तुमच्या मदतीसाठी पुढे येतील. बाजारात अडकलेले पैसे तुम्ही सहज काढू शकाल. परदेशातून व्यवसाय केल्यास फायदा होईल. कोर्टाच्या कामात फायदा होईल.
4/12

धनु राशीच्या लोकांसाठी हा आठवडा भाग्यशाली असेल. या आठवड्यात तुम्हाला चांगली बातमी मिळू शकते. करिअर आणि व्यवसायात अपेक्षित प्रगती होईल. तुमची ऊर्जा योग्य ठिकाणी लावा, यश तुमच्या पाठी येईल. मित्रांच्या मदतीने प्रलंबित कामं पूर्ण होतील. जर तुम्ही परदेशात काम करत असाल तर हा आठवडा तुमच्यासाठी शुभ राहील. कुटुंबासोबत आनंदाचे क्षण घालवाल.
5/12

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा आठवडा चांगला राहील. आयुष्यात शॉर्टकट घेण्याचा सल्ला देणाऱ्यांपासून दूर राहा. मेहनतीने काम करत राहा. ऑफिसच्या कामाचा भार तुमच्यावर जास्त असू शकतो. व्यावसायिकांसाठी हा काळ आव्हानात्मक असेल, अचानक तुमच्यावर खर्चाचा बोजा वाढू शकतो. प्रेमसंबंधात विचारपूर्वक पाऊल टाका.
6/12

मकर राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा शुभ राहील. या आठवड्यात तुम्हाला चांगले परिणाम मिळतील. तुम्हाला घरातील आणि बाहेरील लोकांचा पाठिंबा मिळेल. या काळात तुमचा पगार वाढू शकतो. या आठवड्यात मुलांशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. तुम्ही तुमच्या प्रिय जोडीदारासोबत आनंदाचे क्षण व्यतीत कराल. तुम्ही अविवाहित असाल तर तुमच्या आयुष्यात कोणीतरी व्यक्ती प्रवेश करू शकते.
7/12

नवीन आठवडा कन्या राशीसाठी काहीसा नुकसानकारक असेल. आठवड्याच्या सुरुवातीला लहान भावासोबत किंवा बहिणीशी काही मुद्द्यावरून वाद होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी तुमचे विरोधक तुम्हाला तुमच्या ध्येयापासून मागे खेचण्याचा प्रयत्न करू शकतात.
8/12

तूळ राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा शुभ राहील. करिअर आणि व्यवसायात तुम्हाला फायदा होईल. तुम्ही बऱ्याच दिवसांपासून नोकरीच्या शोधात असाल तर तुम्हाला चांगली नोकरी मिळेल. व्यवसायानिमित्त प्रवास होऊ शकतो. तुम्हाला तुमच्या प्रियकरासोबत आनंदाने वेळ घालवायला मिळेल.
9/12

सिंह राशीच्या लोकांना आठवड्याच्या सुरुवातीला कामानिमित्त लांब किंवा कमी अंतराचा प्रवास होण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या मध्यात नोकरीत वरिष्ठ आणि कनिष्ठांकडून अपेक्षेपेक्षा कमी सहकार्य मिळेल. यामुळे तुमचं मन थोडं उदास राहील.
10/12

वृषभ राशीच्या लोकांवर गुरु बृहस्पतीची विशेष कृपा असणार आहे. तसेच, कुटुंबियांबरोबर तुमचा काळ चांगला जाईल. तुमच्या आयुष्यात आनंद असेल. नोकरदार वर्गाला नशिबाची चांगली साथ मिळेल, अधिकारी तुमच्या कामाची प्रशंसा करतील.
11/12

मिथुन राशीत त्रिग्रही योगासह अनेक राजयोग जुळून येणार आहेत, त्यामुळे या राशीच्या लोकांना विशेष लाभ मिळणार आहे. तुमच्या आयुष्यात विविध मार्गांनी आनंद येईल, पण कोणाच्या जाळ्यात अडकू नका. तुमच्या जोडीदाराबरोबरचा काळ चांगला जाईल. तुमच्या मान-सन्मानात वाढ होईल.
12/12

कर्क राशीसाठी हा आठवडा संमिश्र असणार आहे. या आठवड्यात तुमची नियोजित कामं पूर्ण होतील. व्यवसायाशी संबंधित निर्णय विचारपूर्वक घ्यावे लागतील, अन्यथा एखाद्या योजनेत गुंतवलेले पैसे अडकू शकतात. घाईघाईने निर्णय घेणं टाळा.
Published at : 17 Jun 2024 12:15 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
व्यापार-उद्योग
नागपूर
क्राईम
























