एक्स्प्लोर
Morning Tips : सकाळी उठल्यावर करा 'हे' काम; होईल धन लाभ, दारिद्रय संपेल
Morning Upay : शास्त्रामध्ये पहाटे उठल्यावर शुभ कार्य करण्याचे अनेक फायदे सांगण्यात आले आहेत.
Tips to Get Laxmi Saraswati blessings
1/8

दररोज सकाळची ही पाच 5 शुभ कार्ये तुम्हीही नक्की करा, त्यामुळे तुम्हाला याचा फायदा होईल.
2/8

करदर्शन : दिवसाच्या सुरुवातीलाच तुमच्या ईष्ट देवाची प्रार्थना करा. पहाटे करदर्शन करा. सकाळी उठून दोन्ही हातांच्या तळव्याकडे बघत 'कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूले स्थितो ब्रह्मा प्रभाते करदर्शनम्' मंत्र म्हणत तुमचे दोन्ही हात चेहऱ्यावर फिरवा. यामुळे देवी लक्ष्मी आणि सरस्वतीची कृपा होतं असं म्हटलं जातं.
3/8

सूर्याला जल अर्पण करा : दररोज पहाटे अंघोळ केल्यानंतर तांब्याच्या भांड्यात पाणी आणि लाल चंदन टाकून सूर्यदेवाला हे जल सूर्याला अर्पण करावं. हे काम रोज केल्याने तुमची संपत्ती आणि कीर्ती यात वाढ होते. सूर्योदयानंतर एक तासाच्या आत जल अर्पण करणे अधिक फलदायी आहे.
4/8

तुळशीला पाणी घाला : पहाटे उठून तुळशीला पाणी घालणं, शास्त्रामध्ये शुभ मानलं जातं.
5/8

सकाळी तुळशीला पाणी घालून 'ॐ नमो भगवते वासुदेवाय' या मंत्राचा जप करा. यामुळे घरात भरभराट होते.
6/8

आईवडिलांना नमस्कार करा : आईवडिलांना देवाचा समान दर्जा देण्यात येतो. सकाळी उठून जे लोक आईवडिलांचा आशिर्वाद घेतात, त्यांच्या घरात लक्ष्मी वास करते. संपत्ती भरभराट होते. (फोटो सौजन्य : हिंदी कुंज)
7/8

घरात तुळशीचं पाणी शिंपडा : घरामध्ये तुळशीचं पाणी शिंपडल्याने घरातील क्लेश, दारिद्रय, दु:ख दूर होतं असं, शास्त्रामध्ये म्हटलं गेलं आहे. तुळशीची पूजा केल्यानंतर तांब्याच्या भांड्यात पाणी घेऊन त्यात तुळशीची काही पाने टाकावीत. थोड्या वेळाने हे पाणी घराच्या सर्व कोपऱ्यांवर आणि मुख्य दरवाजावर शिंपडावं.
8/8

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Published at : 11 Oct 2022 10:33 AM (IST)
आणखी पाहा























