एक्स्प्लोर
Surya Gochar 2024 : धनु राशीत सूर्याचं संक्रमण 'या' 3 राशींसाठी धोकादायक; करावा लागणार आर्थिक तंगीचा सामना
Surya Gochar 2024 : ग्रहांचा राजा सूर्य 15 डिसेंबर 2024 रोजी रात्री 9 वाजून 56 मिनिटांनी धनु राशीत प्रवेश करणार आहे.

Surya Gochar 2024
1/8

ग्रहांचा राजा सूर्य 15 डिसेंबर 2024 रोजी रात्री 9 वाजून 56 मिनिटांनी धनु राशीत प्रवेश करणार आहे. तर, 30 दिवसांपर्यंत तो याच राशीत स्थित असणार आहे. त्यानंतर 14 जानेवारी 2025 रोजी सूर्याचं संक्रमण मकर राशीत होणार आहे.
2/8

धनु राशीचा स्वामी गुरु आणि सूर्य-गुरुमध्ये मित्रत्वाचं नातं आहे. पण, सूर्य जेव्हा धनु राशीत प्रवेश करतो तेव्हा हा काळ शुभ कार्यांसाठी शुभ नाही.
3/8

जेव्हा सूर्य धनु राशीत प्रवेश करतो तेव्हा सूर्याच्या तेजाने गुरुच्या शुभ्रतेचा प्रभाव कमी होतो. त्यामुळे खरमासात 30 दिवसांपर्यंत लग्न समारंभ, मुंज, गृहप्रवेशसारखी शुभ कार्य करणं शुभ मानलं जात नाही.
4/8

ज्योतिष शास्त्रानुसार, खरमास लागताच अनेक राशीच्या लोकांना अशुभ परिणाम सहन करावे लागतात. विशेषत: ज्यांच्या कुंडलीत गुरुची स्थिती कमजोर असते अशा लोकांना विशेष काळजी घ्यावी लागते.
5/8

सूर्याने संक्रमण करताच मेष राशीच्या लोकांच्या अडचणीत वाढ होऊ शकते. अशा वेळी तुम्ही वाहन चालवताना काळजी घ्यावी. तसेच, कोणतीही नवीन डील करु नये.
6/8

सूर्य कन्या राशीच्या बाराव्या चरणात असणार आहे. त्यामुळे या काळात तुमच्या धनखर्चात वाढ होऊ शकते. तसेच, यावेळी तुमच्या कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घ्या.
7/8

मकर राशीच्या कुंडलीत आठव्या चरणात सूर्याची स्थिती असल्यामुळे पुढच्या 30 दिवसांपर्यंत हा काळ आव्हानात्मक असणार आहे.
8/8

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Published at : 15 Dec 2024 09:44 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
भारत
विश्व
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion