एक्स्प्लोर
Laxmi Narayan Yog : तब्बल 12 वर्षांनंतर मीन राशीत बनतोय 'लक्ष्मी नारायण योग'; 3 राशींवर पडणार पैशांचा पाऊस, प्रत्येक स्वप्न होणार पूर्ण
Laxmi Narayan Yog : जानेवारी महिन्यात तब्बल 12 वर्षानंतर शुक्र आणि बुध ग्रहाची मीन राशीत युती होत आहे, ज्यामुळे लक्ष्मी नारायण योग निर्माण होईल. याचा मोठा फायदा 3 राशीना होणार आहे.
Laxmi Narayan Yog 2024
1/10

तब्बल 12 वर्षानंतर मीन राशीत शुक्र आणि बुध ग्रहाच्या युतीमुळे लक्ष्मी नारायण योगाची निर्मिती होत आहे.
2/10

ज्योतिष शास्त्रानुसार, धन आणि समृद्धीचा कारक शुक्र 28 जानेवारीला मीन राशीत प्रवेश करेल. 31 मे पर्यंत शुक्र मीन राशीत राहील.
3/10

यानंतर 27 फेब्रुवारीला रात्री 11:46 वाजता बुध ग्रह मीन राशीत प्रवेश करेल. अशा स्थितीत बुध आणि शुक्र हे दोन्ही ग्रह मीन राशीत एकत्र येतील. तब्बल 12 वर्षांनंतर मीन राशीत हा संयोग होत आहे.
4/10

बुध आणि शुक्राच्या युतीमुळे लक्ष्मी नारायण योगाची निर्मिती होत आहे, ज्यामुळे 3 राशीच्या लोकांना अचानक मोठा आर्थिक लाभ होऊ शकतो. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेले पैसे तुम्हाला मिळू शकतात, या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
5/10

कुंभ रास : कुंभ राशीच्या लोकांसाठीही बुध आणि शुक्राची युती भाग्याची ठरेल. या काळात तुमचे व्यक्तित्व सुधारेल. या काळात तुमच्या आयुष्यात सुख-समृद्धी येईल. नोकरी करणाऱ्यांना प्रमोशन मिळेल. गुंतवणूक करणं फायदेशीर ठरेल.
6/10

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यश मिळेल. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. उत्पन्नाचे नवे स्त्रोत निर्माण होतील. वैवाहिक जीवन सुखमय राहील. बौद्धिक क्षमता वाढेल. व्यवसायात यश मिळेल.
7/10

मिथुन रास : बुध आणि शुक्राची युती मिथुन राशीच्या लोकांसाठी खूप लाभदायी ठरेल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. तुमच्या मानसन्मानात वाढ होईल. या राशीच्या लोकांना आयुष्यात खूप नवे बदल दिसून येतील.
8/10

तुमची आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. तुमच्या बोलण्याने लोक प्रभावित होतील. कुटुंबीयांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. कुठेतरी फिरायला जाल.
9/10

मीन रास : मीन राशीच्या व्यक्तींसाठी लक्ष्मी नारायण योग सुखाच्या सरी घेऊन येईल. या काळात तुम्हाला शुभवार्ता मिळतील. अचानक धनलाभाचे संकेत आहेत. समाजात तुमचा मानसन्मान वाढेल. या काळात तुमची आर्थिक परिस्थिती उत्तम राहील.
10/10

कुटुंबात शुभकार्ये होतील. ऑफिसमध्ये तुमच्या कामाचं कौतुक होईल. समजात लोकप्रियता वाढेल. अडकलेली कामं पूर्णत्वास येतील. आरोग्य समस्या जाणवणार नाही. कुटुंबीयांची साथ मिळेल. मानसिक तणावातून मुक्त व्हाल. वैवाहिक जीवन सुखमय असेल.
Published at : 17 Dec 2024 11:59 AM (IST)
View More
Advertisement
Advertisement


















