एक्स्प्लोर
Ganesh Visarjan 2024 : मंगळवारी गणपतीचं विसर्जन करणं योग्य की अयोग्य? शास्त्र सांगते...
Anant Chaturdashi 2024 : मंगळवारचा दिवस हा गणपती बाप्पाला समर्पित आहे, या दिवशी बाप्पाची मनोभावे पूजा करतात. मग याच पवित्र दिवशी बाप्पाचं विसर्जन करणं योग्य आहे का? जाणून घ्या.
Ganesh Visarjan 2024
1/10

दरवर्षी अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात येतो. यंदा अनंत चतुर्दशी मंगळवारी, 17 सप्टेंबरला आली आहे.
2/10

मंगळवार हा दिवस गणपती बाप्पाला समर्पित आहे आणि नेमकी या दिवशीच अनंत चतुर्दशी आली आहे.
3/10

ज्या दिवशी गणपतीची भक्तिभावाने पूजा केली जाते, त्या मंगळवारच्या दिवशी बाप्पाचं विसर्जन करणं योग्य आहे का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
4/10

मंगळवारी गणपती बाप्पाचं विसर्जन करावं की नाही? याबाबत शास्त्र काय सांगते? जाणून घेऊया...
5/10

प्राचीन मान्यतेनुसार, मंगळवार हा गणपती बाप्पाला समर्पित असल्याने या दिवशी गणरायाची विशेष पूजा केली जाते. मंगळवारी गणपतीचं नामस्मरण, उपासना, सेवा केल्याने पुण्य फलाची प्राप्ती होते, असं सांगितलं जातं.
6/10

दर मंगळवारी न चुकता उपवास करुन बाप्पाची सेवा करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे आता मंगळवारी लाडक्या बाप्पाचं विसर्जन कसं करावं, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
7/10

मंगळवारी अनंत चतुर्दशीला गणपतीचं विसर्जन न करता दुसऱ्या दिवशी करावं का, असाही प्रश्न अनेकांना पडला आहे.
8/10

परंतु, तसं पाहिलं तर मंगळवार आणि गणपती विसर्जन याचा तसा काही संबंध नाही. यापूर्वीही 2015 आणि 2020 मध्ये अनंत चतुर्दशी मंगळवारी आली होती.
9/10

त्यामुळे यंदाही आपण प्रथा, परंपरेनुसार 17 सप्टेंबरला गणपती विसर्जन करू शकता, असं सांगितलं जातं.
10/10

त्यामुळे मंगळवारी वाजतगाजत मिरवणुका काढत बाप्पाला साश्रु नयनाने निरोप दिला जाणार आहे.
Published at : 16 Sep 2024 03:10 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























