एक्स्प्लोर
Bail Pola 2024 Wishes In Marathi : बैलपोळ्याच्या शेतकरी बांधवाला द्या खास शुभेच्छा; करा सर्जाराजाला नमन, पाठवा 'हे' शुभेच्छापर फोटो
Bail Pola Wishes : पोळा हा बैलांचा सन्मान करणारा सण आहे, जो महाराष्ट्रातील शेतकरी उत्साहाने साजरा करतात. या दिवशी घरात गोडाचं जेवण बनवून बैलांची पूजा केली जाते, याचे शुभेच्छा संदेश तुम्ही पाठवू शकता.

Bail Pola 2024 Wishes In Marathi
1/10

बैल पोळ्याचा हा सण सर्जा राजाचा हा दिन बळीराजा संगे जो राबतो रात-दिन सांग आम्हा कसे फेडावे तुझे हे ऋण बैल पोळा सणाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
2/10

बाकदार पाठीवरती झूल मखमली बसवा गळ्यात घंटणी माळा पायात घुंगरांच्या वाळा आज आहे सण पोळा सर्जा राजाला ओवाळा बैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा!
3/10

जिवा शिवाची बैल जोडं, लाविल पैजंला आपली कुडं, आला त्यांचा सण खास, बैल पोळ्याच्या शुभेच्छा!
4/10

झुलं,शेंब्या,चाळ, घुंगरं…, तिफन,कुळव,शिवाळ, शेती अवजारांचा आज थाट, औताला सुट्टी,सर्जा- राजा आनंदात, शेतकरी बांधवांना बैलपोळाच्या शुभेच्छा!
5/10

कोसळती श्रावणधारा धरणिमायही नटली हिरवाईचा नेसून शालू नववधूसम भासली भाव-भक्तिने भरला आज मनाचा आरसा पिठोरी अमावस्या हिंदू संस्कृतीचा वारसा पिठोरी आमावस्येच्या हार्दिक शुभेच्छा!
6/10

आला आला रे बैल पोळा गाव झालं सारं गोळा सर्जा राजाला घेऊनी सारे जाऊया राऊळा बैलपोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा!
7/10

आज पुंज रे बैलाले फेडा उपकाराचं देणं बैला खरा तुझा सण शेतक-या तुझं रीन बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
8/10

नको लावू फास बळीराजा आपुल्या गळा दे वचन आम्हास आज दिनी बैल पोळा बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
9/10

जसे दिव्याविना वातीला आणि वातीविना दिव्याला नाही पर्याय तसेच कष्टाविना मातीला आणि बैलाविना नाही शेतीला पर्याय बैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा!
10/10

शिंगे घासली बाशिंगे लावली, माढूळी बांधली मोरकी आवळली. तोडे चढविले कासरा ओढला घुंगरूंमाळा वाजे खळाखळा आज सण आहे बैलपोळा.. पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
Published at : 02 Sep 2024 07:41 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
क्राईम
क्रिकेट
नागपूर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
