एक्स्प्लोर
डाळिंब उत्पादनात महाराष्ट्र आघाडीवर
देशात मोठ्या प्रमाणात डाळिंबाचे उत्पादन (Pomegranate Production) होते. देशातील फक्त चार राज्यातच 95 टक्के डाळिंबाचे उत्पादन होते
pomegranate production (PC : Abp News File Photo)
1/9

देशातील फक्त चार राज्यातच 95 टक्के डाळिंबाचे उत्पादन होते.
2/9

आरोग्याच्या दृष्टीनं डाळिंब हे पिक खूप महत्वाचे आहे. डाळिंबाचे अनेक फायदे आहेत. डाळिंबात अनेक पोषक घटक आढळतात.
3/9

डाळिंबात जीवनसत्त्वे, फायबर, लोह, पोटॅशियम आणि झिंक आढळतात. या कारणांमुळे वर्षभर बाजारात डाळिंबाची मागणी कायम राहते.
4/9

भारतात सर्वाधिक डाळिंबाचे उत्पादन महाराष्ट्रात होते. म्हणजे उत्पादनाच्या बाबतीत महाराष्ट्र आघाडीवर आहे.
5/9

महाराष्ट्रातील शेतकरी दरवर्षी डाळिंबाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जातं. देशातील एकूण डाळिंब उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा हा 54.85 टक्के आहे.
6/9

डाळिंब हे एक असे फळ आहे की जे प्रत्येक ऋतूत खाल्ले जाते. डाळिंब हे फळ आरोग्यासाठी आणि कमाई या दोन्हीसाठी खूप फायदेशीर आहे.
7/9

महाराष्ट्रानंतर गुजरातमध्ये डाळिंबाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. येथील शेतकरी 21. 28 टक्के डाळिंबाचे उत्पादन घेतात.
8/9

भारतातील पहिल्या तीन राज्यांमध्ये कर्नाटक तिसऱ्या क्रमांकावर आहे. इथं 9.51 टक्के डाळिंबाचे उत्पादन होते. राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाच्या (2022-23) आकडेवारीनुसार, आंध्र प्रदेश डाळिंबाच्या उत्पादनात चौथ्या स्थानावर आहे.
9/9

संशोधनानुसार, दररोज डाळिंब खाण्याचे अनेक फायदे आहेत. ज्यामुळं दीर्घकालीन आजार, कर्करोग आणि अनेक हृदयविकारांची शक्यता कमी होण्यास मदत होईल.
Published at : 28 Jan 2024 09:09 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
नाशिक
व्यापार-उद्योग
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
