एक्स्प्लोर
Kisan Sabha : सरकारनं कांदा उत्पादकांना दिलासा द्यावा, किसान सभेची मागणी
Kisan Sabha : कांद्याच्या दरात घसरण जाल्यानं किसान सभा आक्रमक झाली आहे.
onion prices
1/9

कांद्याच्या प्रमुख बाजार समित्यांमधील विक्रीदर 450 ते 600 रुपयांपर्यंत खाली कोसळल्याने महाराष्ट्रभरातील कांदा उत्पादक शेतकरी (Onion Farmers) हवालदिल झाले आहेत.
2/9

राज्यातील भाजप-शिंदे सरकारनं (BJP-Shinde Govt) तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी किसान सभेच्या (Kisan Sabha) वतीनं करण्यात आली आहे.
3/9

सरकारने कांदा उत्पादकांना मदत करण्यासाठी हस्तक्षेप न केल्यास मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पणनमंत्री आणि कृषिमंत्री यांच्या दारात कांदे ओतण्याचे आंदोलन किसान सभा हातात घेईल असा इशारा किसान सभेचे नेते डॉ. अजित नवलेंनी (Dr. Ajit Nawale) दिलाय.
4/9

सत्ताधाऱ्यांनी सत्ताखेळ थांबवावा आणि कांदा उत्पादकांना दिलासा द्यावा अशी मागणी किसान सभेनं केली आहे.
5/9

सरकारनं शेतकऱ्यांची ही संतापजनक उपेक्षा थांबवावी, कांदा उत्पादकांना तातडीने मदत करावी अशी मागणी किसन सभेचे नेते अजित नवलेंनी केलीय
6/9

राज्यातील प्रमुख कांदा बाजार समित्यांमधील विक्रीदर 450 ते 600 रुपयांपर्यंत खाली आले आहेत. सरकारी यंत्रणांनी मान्य केलेला कांद्याचा उत्पादन खर्च 850 ते 900 रुपये प्रति क्विंटल आहे
7/9

राज्यात आजमितीला कांद्याला प्रतिक्विंटल केवळ 450 रुपये ते 600 रुपयांचा दर मिळत असल्याचे अजित नवले म्हणाले.
8/9

कांद्याचा उत्पादन खर्च तर सोडाच या दरात काढणी आणि वाहतुकीचा दरही भरून निघत नाही. राज्यातील भाजप-शिंदे सरकारनं या पार्श्वभूमीवर तातडीने हस्तक्षेप करण्याची आवश्यकता आहे.
9/9

सरकारनं शेतकऱ्यांची ही संतापजनक उपेक्षा थांबवावी आणि कांदा उत्पादकांना तातडीने मदत करावी अशी मागणी किसन सभा करत आहे.
Published at : 23 Feb 2023 09:42 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
भारत
शेत-शिवार
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
