एक्स्प्लोर
Photo : बदलत्या हवामानाचा 'ज्वारी'ला फटका
Agriculture News
1/10

बदलत्या हवामानाचा शेती पिकांवर (Agriculture Crop) मोठा परिणाम होत असल्याचं चित्र दिसत आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत. ज्वारी पिकावर देखील परिणाम झाला आहे.
2/10

थंडीतील चढ उतारामुळं पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव होताना दिसत आहे. अहमदनगरच्या (Ahmednagar) जामखेड येथील खर्डा (Kharda) परिसरात हवामान बदलाचा ज्वारीच्या पिकाला (jowar Crop) मोठा फटका बसला आहे.
3/10

ज्वारीच्या पिकावर चिकटा, मावा, लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळं शेतकरी संकटात सापडला आहे.
4/10

अहमदनगरच्या जामखेड येथील खर्डा परिसराची ज्वारीचं माहेरघर अशी ओळख आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर ज्वारीचं उत्पादन घेतलं जातं.
5/10

यावर्षी ज्वारी उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. कारण हवामान बदलामुळं ज्वारीवर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. ज्वारीचं पीक हुरड्यात आलेलं असताना चिकटा, मावा, लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे.
6/10

दरवर्षी हजारो क्विंटल ज्वारीचं उत्पादन देणाऱ्या खर्डा परिसरातील शेतकरी आता हवालदिल झाला आहे.
7/10

एकीकडे बदलत्या हवामानाचा ज्वारी पिकावर परिणाम होत असतानाच दुसरीकडे खर्डा परिसरात रानडुकरांचा उपद्रव वाढताना दिसत आहे. डुकरांनी ज्वारी पिकाची मोठ्या प्रमाणात नासाडी केली आहे.
8/10

जामखेड येथील खर्डा परिसराची ज्वारीचं माहेरघर अशी ओळख आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर ज्वारीचं उत्पादन घेतलं जातं.
9/10

यावर्षी ज्वारी उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. कारण हवामान बदलामुळं ज्वारीवर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे.
10/10

अनेक ठिकणी ज्वारीचं पीक खाली पडलं आहे. याचा परिणाम कडब्यावर होणार आहे. त्यामुळं यावर्षी ज्वारीच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे
Published at : 19 Jan 2023 09:47 AM (IST)
View More
Advertisement
Advertisement


















