एक्स्प्लोर
sugarcane : ऊस तोडणी यंत्राच्या खरेदीसाठी सरकारकडून 40 टक्के अनुदान
ऊस तोडणी यंत्र (Sugarcane Harvester) खरेदीसाठी अनुदान देण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे.
sugarcane Harvester machine
1/10

राज्यात दरवर्षी ऊसाच्या लागवडीच्या (Sugarcane cultivation) क्षेत्रात वाढ होत आहे. त्यामुळ ऊसतोड कामगारांची देखील कमतरता भासत आहे.
2/10

सरकारनं आर्थिक वर्ष 2022-23 आणि 2023-24 मध्ये राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत ऊस तोडणी यंत्र (Sugarcane Harvester) खरेदीसाठी अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे.
3/10

ऊस तोडणी यंत्र खरेदीसाठी 40 टक्के किंवा 35 लाख रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल इतक्या रकमेइतके अनुदान देण्यात येणार आहे.
4/10

ऊस तोडणी यंत्रामुळं ऊसतोड कामगारांच्या कमतरतेवर मार्ग काढणं शक्य होणार आहे.
5/10

ऊस तोडणी यंत्रासाठी देण्यात येणारं अनुदान हे व्यक्तिगत तसेच शेतकरी उत्पादक संस्था, खासगी आणि सहकारी साखर कारखाने, सहकारी संस्थांना देण्यात येणार आहे.
6/10

महाराष्ट्रात गेल्या हंगामातील ऊस लागवडीखालील क्षेत्र हे 14.88 लाख हेक्टर होते. तर 1321 लाख मेट्रीक टन इतके ऊसाचे गाळप झाले आहे.
7/10

ऊसाची तोडणी वेळेवर होण्यासाठी ऊस तोडणी यंत्राव्दारे करणे गरजेचे झाले आहे. कारण सध्या ऊस तोडणी कामगारांची कमतरता भासत आहे.
8/10

ऊस तोडणी यंत्राच्या किंमती जास्त असल्यामुळे यंत्राच्या खरेदीदारास काही प्रमाणात अनुदान उपलब्ध करून दिल्यास यंत्राच्या सहाय्याने ऊस तोडण्यास प्रोत्साहन मिळेल आणि ऊस तोडणी वेळेत पूर्ण करण्यास मदत होणार असल्याचं सरकारच्या वतीनं सांगण्यात आलं आहे.
9/10

वैयक्तिक शेतकरी, उद्योजक यांच्याबाबत एका कुटुंबातील एकाच व्यक्तीस ऊस तोडणी यंत्र खरेदीसाठी अनुदान देण्यात येणार आहे. तर खासगी आणि सहकारी साखर कारखान्यांना प्रत्येकी जास्तीत जास्त तीन यंत्रांसाठी अनुदान देण्यात येणार असल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली आहे.
10/10

पात्र लाभार्थ्यांनी यंत्राच्या किंमतीच्या किमान 20 टक्के रक्कम स्वभांडवल म्हणून गुंतवणूक करणं आवश्यक आहे.
Published at : 24 Mar 2023 08:07 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
सोलापूर
आयपीएल
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
