ग्रामीण राजकारणाचा आजवर न पाहिलेला पैलु 'खुर्ची' या सिनेमाद्वारे लवकरच मोठ्या पडद्यावर झळकण्यास सज्ज होत आहे.
2/7
अक्षयसह या चित्रपटात अभिनेता आर्यन संतोष हगवणे, अभिनेत्री श्रेया पसलकर या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत. याशिवाय अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भोसले यांनी ही चित्रपटात दमदार भूमिका साकारली आहे.
3/7
या चित्रपटातील भूमिकेबद्दल विचारले असता अक्षय म्हणाला, 'राजकारण हा विषय माझ्याही आवडीचा आहे. त्यामुळे चित्रपटात भूमिका साकारताना मी स्वतः त्या भूमिकेशी एक झालोय. एका वेगळ्या धाटणीची अशी ही भूमिका मी पहिल्यांदाच साकारतोय त्यामुळे मी ही स्वतःला या भूमिकेत मोठ्या पडद्यावर पाहायला आवर्जून उत्सुक आहे. माझ्या वैयक्तिक जीवनातही राजकारण हा विषय अगदी माझ्या जवळचा आहे त्यामुळे त्याचा माझ्यावर होणारा प्रभाव या चित्रपटातून कुठेतरी दिसेल असे मला वाटते. गावाकडील राजकारणाचे डावपेच एकंदरीत या चित्रपटात प्रत्यक्षात पाहायला मिळणार आहेत. राजकारण हा विषय हातळतानाचा मी तुम्हाला नक्कीच भावेल याची मला खात्री आहे'.
4/7
अक्षयची ही आगळीवेगळी आणि दमदार भूमिका नक्कीच साऱ्या प्रेक्षकांना भावेल यांत शंकाच नाही.
5/7
आगामी चित्रपटात सम्राट नावाची व्यक्तिरेखा तो या चित्रपटात साकारत आहे. खेड्यात राहणारा आणि गावात नावलौकिक असलेल्या 25 वर्षांच्या स्वतःच्या धुंदीत राहणाऱ्या मात्र गावावर स्वतःचे वर्चस्व असणाऱ्या सम्राट या मुलाचे पात्र तो या चित्रपटात साकारत आहे.
6/7
'युथ', 'होऊ दे जरासा उशीर', 'दोस्तीगिरी' यांसारख्या चित्रपटातून तर 'ती फुलराणी' या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अभिनेता अक्षय वाघमारे. लवकरच हा अभिनेता एका नव्या कोऱ्या 'खुर्ची' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीसाठी येत आहे.
7/7
दिग्दर्शक अविनाश खोचरे पाटील आणि 'अॅक्ट प्लॅनेट टीम' दिग्दर्शित हा चित्रपट 'आराध्या मोशन फिल्म्स' प्रस्तुत, संतोष वसंत हगवणे निर्मित असून सहनिर्माता म्हणून सचिन दिपक शिंदे, विशाल आप्पा हगवणे, प्रदीप नत्थीसिंग नागर, आणि डॉ स्नेहा जोगळेकर यांनी चित्रपटाची उत्तम बाजू पेलली आहे. खेड्यापाड्यातल्या लहान मुलांपर्यंत पोहोचलेल्या राजकारणाचे चित्रण दर्शविणारा हा सिनेमा आहे. गावागावात खुर्चीसाठीच्या राजकारणात लहान मुलांच्या मनावर बिंबत जाणारे राजकारणाचे डावपेच 'खुर्ची' सिनेमातून दिग्दर्शकाने उत्तमरीत्या मांडले आहे.