यवतमाळ जिल्हा बनला गोवंश तस्करीचा 'हॉटस्पॉट', वर्षभरात 13 कोटींचा मुद्देमाल जप्त
Yavatmal : साडे तेरा महिन्यात (जानेवारी 2024 ते आजपर्यंत) 151 गुन्हे दाखल असून 13 कोटी 18 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

यवतमाळ : गोमातेला राज्य मातेचा दर्जा शासनाने दिला असला तरी गोमातेची आणि गोवंशाची कत्तल आणि तस्करी थांबलेली नाही. अशातच वणी पांढरकवडा येथे गोवंशाचे अवशेष आढळून आल्याने जिल्हात गोवंश तस्करीचा प्रश्न चांगलाच ऐरणीवर आला आहे. गोवंश तस्करीचे वाहने मध्यप्रदेश, नागपूर आणि यवतमाळ जिल्ह्याच्या ठिकाणावरून निघून नागपूर-हैदराबाद महामार्गाने तेलंगणात राज्यात जनावरे कोंबून नेली जातात.
जानेवारी 2024 पासून आजपर्यंत म्हणजेच साडे तेरा महिन्यात विविध पोलिस ठाण्यात 151 गुन्हे दाखल झाले. तर 13 कोटी 18 लाख 47 हजारांचे गोवंश आणि 146 वाहने जप्त करण्यात आले. वास्तवात मात्र या दहा टक्के सुद्धा कारवाया नसल्याचे गोरक्षक संघटनेकडून बोलल्या जात आहे. यावरून यवतमाळ जिल्हा जनावर तस्करीचा ’हॉटस्पॉट’ तर बनला नाही ना असा प्रश्न निर्माण होत आहे.
जिल्ह्यातील पांढरकवडा, वणी, कळंब, घाटंजी, महागाव, उमरखेड तालुक्यातून जनावर तस्करीचे वाहने थेट तेलंगणात जातात. या पोलिस ठाण्यातील अधिकार्यांसह कर्मचार्यांना जनावर तस्करीची इत्थंभूत माहिती आहे. परंतु देखाव्यापुरती जनावर तस्करीच्या कारवाया पोलिसांकडून केल्या जात जाते यासाठी आता पोलिस महानिरीक्षक आणि जिल्हा पोलिस अधीक्षकांनाच विशेष पावले उचलण्याची वेळ आली आहे.
या मार्गाने गोवंशाची वाहतूक
मध्यप्रदेश - नागपूर - हिंगणघाट - वडनेर - वडकी - करंजी - पांढरकवडा - पिंपळखुटी - हैद्राबाद(तेलंगणा)
- जप्त वाहनाचे परवाने रद्द करण्याचे RTO ला आदेश.
- दोन पेक्षा अधिक गुन्हे असणाऱ्या आरोपींवर,मकोका, एमपीडीए, तडीपारची कारवाई प्रस्तावित.
- बहुतांश गोरक्षक संघटना आणि पोलिस यांची संयुक्त कारवाई.
- तेलंगणाला राज्याची सीमा लागून असल्यामुळे चेक पोस्टवर सर्वाधिक कारवाई.
ही बातमी वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

