(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Haribhau Rathod : शेतकऱ्यावर दुबार पेरणीचं संकट, सरकारनं तात्काळ मदत जाहीर करावी; हरिभाऊ राठोडांची मागणी
Haribhau Rathod: सरकारनं दुबार पेरणीसाठी शेतकऱ्यांसाठी तात्काळ मदत जाहीर करावी अशी मागणी बीआरएस पक्षाचे वरिष्ठ नेते आणि माजी खासदार हरिभाऊ राठोड (brs leader Haribhau Rathod) यांनी केली आहे.
Haribhau Rathod: आज शेतकऱ्यांची (Farmers) फार वाईट स्थिती आहे. पाऊस नसल्यामुळं शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे. त्यामुळं सरकारनं दुबार पेरणीसाठी शेतकऱ्यांसाठी तात्काळ मदत जाहीर करावी अशी मागणी बीआरएस पक्षाचे वरिष्ठ नेते आणि माजी खासदार हरिभाऊ राठोड (brs leader Haribhau Rathod) यांनी केली आहे. सध्या शेकऱ्यांकडे दुबार पेरणीसाठई पैसा नाहीत. त्यामुळं शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्याचे राठोड म्हणाले. ते यवतमाळमध्ये बोलत होते.
या आठवड्यात यवतमाळ जिल्ह्यात 10 शेतकऱ्यांच्या आत्महत्या
यवतमाळ जिल्हा हा आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो. गेल्या जून महिन्यात यवतमाळ जिल्ह्यात 36 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी दिली. या आठवड्यात सुद्धा यवतमाळ जिल्ह्यात १० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे राठोड म्हणाले. शेतकऱ्यांकडे सध्या पेरणीसाठी पैसा नाही. त्यामुळं सरकारनं दुबार पेरणीसाठी शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी अशी मागणी राठोड यांनी केली.
शेतकऱ्यांनी आत्महत्या करणं ही सरकारसाठी लाजीरवाणी गोष्ट
शेतकरी आत्महत्येवरुन हरिभाऊ राठोड यांनी सरकारवर जोरदार टीका देखील केली. शेतकऱ्यांनी आत्महत्या करणं ही सरकारसाठी लाजीरवाणी गोष्ट असल्याचे हरिभाऊ राठोड म्हणाले. सरकारचे शेतकऱ्यांकडे कोणत्याही प्रकारचे लक्ष नाही. त्यामुळं सध्या अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना सरकारनं तातडीनं मदत करावी अशी मागणी राठोड यांनी केली आहे. राज्यामध्ये लवकरात लवकर कोरडा दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना सरकारनं योग्य ती मदत जाहीर करावी, अशी मागणी देखील राठोड यांनी केली.
बळीराजा पावसाच्या प्रतीक्षेत
राज्यातील काही भागात चांगला पाऊस होत आहे, तर काही भागात अद्यापही पाऊस पडताना दिसत नाही. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. तर काही ठिकाणी पाण्याअभावी शेतकऱ्यांची पिकं वाया जात आहेत. पावसाळा सुरु होऊन महिना उलटला तरी अद्याप राज्यात चांगला पाऊस झाला नाही. मुंबईसह उपनगर ठाणे, कोकण या भागात पावसानं दमदार हजेरी लावली आहे. मात्र, राज्याच्या इतर भागात अद्याप म्हणावा तसा पाऊस झाला नाही. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत. महाराष्ट्रात कोकण आणि सह्याद्रीच्या घाट माथ्यावर पाऊस बरसत असताना दिसत असला तरी उर्वरीत महाराष्ट्रात (Maharashtra) अद्यापही हवा तसा पाऊस झालेला नाही. जून महिन्यात संपूर्ण राज्यात सरासरी 209.8 मिमी पाऊस होत असतो. मात्र, यावर्षी राज्यात 1 जून ते 30 जून दरम्यान फक्त 113.4 मिमी पाऊस बरसला आहे. राज्यात पावसानं सरासरी देखील गाठलेली नाही.
महत्त्वाच्या बातम्या :
Haribhau Rathod: अजून चार उपमुख्यमंत्री करा, पण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा; हरिभाऊ राठोडांची मागणी