एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
चीनच्या शी जिनपिंग यांची पुन्हा 'ड्रॅगन' चाल
जिनपिंग यांनी सैन्याला युद्धासाठी सज्ज राहण्याचे आदेश दिले होते. आता पुन्हा त्यांनी तीच री ओढली आहे.
नवी दिल्ली: दुसऱ्यांदा चीनच्या सर्वोच्चपदी विराजमान झाल्यानंतर राष्ट्रपीत शी जिनपिंग यांनी चाली खेळण्यास सुरुवात केली आहे. जिनपिंग यांनी त्यांच्या सैन्याची भेट घेऊन युद्धाजन्य स्थितीसाठी तयार राहण्याचे आदेश दिले आहेत.
यापूर्वीही जिनपिंग यांनी सैन्याला युद्धासाठी सज्ज राहण्याचे आदेश दिले होते. आता पुन्हा त्यांनी तीच री ओढली आहे.
जगात सर्वाधिक सैन्य चीनकडे
चीनच्या मिलिट्रीकडे जगात सर्वाधिक सैन्य आहे. आशियात तर त्यांच्या जवळपासही जाणारा दुसरा देश नाही. चीनकडे जवळपास 23 लाख जवान आणि अधिकारी आहेत.
शेजारील देशांसोबत तणाव
चीन नेहमीच शेजारील देशांशी कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे शेजारील राष्ट्रांसोबत चीनचे संबंध हे तणावाचे आहेत. सातत्याने विस्ताराची भूमिका घेत जमिनी लाटण्याचं काम चीन करत आहे. त्यामुळेच उत्तर कोरिया सोडून कोणत्याच देशाशी चीनचे चांगले संबंध नाहीत.
उत्तर कोरियासोबतच्या चांगल्या संबंधांमुळे, जपान, दक्षिण कोरिया, इंडोनेशिया आणि व्हिएतनाम हे देशही चीनवर नाराज आहेत. तर दक्षिण चीन समुद्रातील अधिकारांवरुन फिलिपाईन्स, मलेशिया, व्हिएतनाम, तैवान या देशांसोबतही चीनचा तणाव आहे. तर भारतोसबत डोकलामवरुन चीनची धूसफूस चालूच आहे.
संबंधित बातम्या
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
सिंधुदुर्ग
निवडणूक
Advertisement