एक्स्प्लोर
Advertisement
लंडनच्या मशिदीत जगातील सर्वात मोठ्या समोशाची निर्मिती
समोसा तयार करण्यासाठी 15 तासांचा वेळ लागला. या समोशाचं वजन 337.5 पाऊंड म्हणजेच 153.1 किलो आहे.
लंडन : लंडनमध्ये जगातील सर्वात मोठ्या समोशाची निर्मिती करण्यात आली आहे. पूर्व लंडनमधील मशिदीत तयार केलेल्या समोशाचं वजन तब्बल 153 किलो असून त्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे.
मुस्लिम कर्मचारी आणि स्वयंसेवकांनी हा जगातील सर्वात मोठा समोसा तयार करण्यासाठी मेहनत घेतली. मंगळवार 22 ऑगस्ट रोजी हा समोसा तयार करण्यात आला. समोसा तयार करण्यासाठी 15 तासांचा वेळ लागला. या समोशाचं वजन 337.5 पाऊंड म्हणजेच 153.1 किलो आहे.
लंडनमधील मशिदीतच समोशासाठी कांदा-वाटाणा-बटाट्याचं सारण, मैद्याचं आवरण तयार करण्यात आलं. त्यानंतर तो समोसा तळण्यात आला. भव्य समोशाला त्रिकोणी आकार येणं, हे मोठं आव्हान होतं. यूकेतील संस्थेच्या डझनभर मुस्लिम कार्यकर्त्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला होता.
गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या अधिकाऱ्यांनी ही प्रक्रिया पाहिली. संबंधित समोसा आवश्यक त्या चाचण्यांमध्ये पास झाल्यानंतर त्याला जगातील सर्वात मोठ्या समोशाचा बहुमान मिळाला. समोशाचे शेकडो तुकडे करुना गरीबांना वाटण्यात आले.
जून 2012 मध्ये उत्तर इंग्लंडच्या ब्रॅडफोर्ड कॉलेजने 110.8 किलो वजनाचा समोसा बनवून विक्रम नोंदवला होता. हा विक्रम लंडनमधील समोशाने मोडित काढला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
व्यापार-उद्योग
निवडणूक
Advertisement