World Water Day 2022 : जागतिक जल दिनानिमित्त जाणून घ्या इतिहास, थीम आणि महत्त्व
World Water Day 2022 : जागतिक जल दिनाचे उद्दिष्ट सर्व सजीव प्रजातींच्या अस्तित्वासाठी आवश्यक असलेल्या पाण्याच्या संवर्धनासाठी जनजागृती करणे हा आहे.
World Water Day 2022 : जगण्यासाठी पाणी अत्यंत गरजेचे आहे. पाण्याशिवाय मनुष्य, प्राणी, सजीवसृष्टीची कल्पनाही करता येणार नाही. ताज्या पाण्याचे महत्त्व आणि या नैसर्गिक स्त्रोताच्या व्यवस्थापनाविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 22 मार्च रोजी जागतिक जल दिन (World Water Day 2022) साजरा केला जातो. पृथ्वीवर पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध असले तरी त्यातील केवळ 2.5 टक्के पाणी वापरासाठी योग्य आहे. बाकी सर्व खारे पाणी आहे, जे सेवन करता येत नाही. त्यामुळे भावी पिढ्यांसाठी पाण्याचे संवर्धन करणे ही आपली जबाबदारी आहे.
जागतिक जल दिनाची थीम (World Water Day 2022 Theme) :
जागतिक जल दिनाची थीम आहे अदृश्य दृश्यमान करणे. (World Water Day is Groundwater: Making The Invisible Visible). भूजल अदृश्य आहे, परंतु त्याचा प्रभाव सर्वत्र दिसत आहे. जगातील जवळजवळ सर्व द्रव गोडे पाणी भूजल आहे. जसजसे हवामान बदल वाढत जाईल तसतसे भूजल अधिकाधिक गंभीर होत जाईल. या मौल्यवान संसाधनाचे शाश्वत व्यवस्थापन करण्यासाठी आपण एकत्र काम करणे आवश्यक आहे.
जागतिक जल दिनाचा इतिहास (World Water Day 2022 History) :
22 मार्च हा दिवस 1993 पासून जागतिक जल दिन म्हणून साजरा केला जातो. तेव्हापासून हा दिवस जलसंवर्धनाच्या महत्त्वाविषयी समाजात जागरुकता वाढवण्यासाठी साजरा केला जातो.
जागतिक जल दिनाचे महत्त्व (World Water Day 2022 Importance) :
UN एजन्सीद्वारे जागतिक जल दिनाचा जागतिक स्तरावर प्रचार केला जातो. हे लोकांना पाण्याच्या गंभीर समस्या सोडविण्याचे आवाहन करते. युनायटेड नेशन्स (यूएन) च्या वेबसाइटनुसार, या दिवसाचा मुख्य उद्देश "शाश्वत विकास उद्दिष्ट (SDG) 6: 2030 पर्यंत सर्वांसाठी पाणी आणि स्वच्छता" साध्य करण्यासाठी समर्थन करणे आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Trending : तरुणीच्या गालावर 'ती' खळी नाहीच! भन्नाट आयडीया, सोशल मिडियावर ट्रोल
- आतापर्यंत तुम्ही गुलाबजाम खाल्ले आहेत, पण गुलाबजाम पराठा तुम्हाला माहित आहे का? पाहा हा व्हिडीओ
- Zomato Swiggy App Down: झोमॅटो, स्विगीचे अॅप डाऊन, सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha