World Tribal Day 2022 : निसर्गपूजक समाज म्हणून ओळख असलेल्या आदिवासींचा इतिहास जाणून घ्या
World Tribal Day 2022 : दरवर्षी संयुक्त राष्ट्रसंघाकडून (UNO) जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात येतो.
World Tribal Day 2022 : देशातील मूळ निवासींना मानवी अधिकार मिळावेत तसेच त्यांच्या संरक्षणासाठी दरवर्षी संयुक्त राष्ट्रसंघाकडून (UNO) 'जागतिक आदिवासी दिन' (World Tribal Day 2022) साजरा करण्यात येतो. 1993 साली UNWGIP कार्यकारिणीच्या 11 व्या अधिवेशनात मूळनिवासी घोषणेला मान्यता मिळाल्यानंतर 1994 ला मूळनिवासी वर्ष आणि 9 ऑगस्ट 'जागतिक आदिवासी दिन' म्हणून घोषित करण्यात आले.
आदिवासी दिन का साजरा केला जातो?
21 व्या शतकातही जगातील विविध भागांत राहणारा आदिवासी समाज आजही बेरोजगारी, बाळ मजूरी, भेदभाव, उपेक्षा, स्थलांतर, अन्न, वस्त्र, निवारा, गरीबी, निरक्षरता, आरोग्य सुविधा, शैक्षणिक सुविधा, मोल मजुरी, सामाजिक विकास, आर्थिक प्रश्न, शैक्षणिक मागासलेपणा अशा प्रकारच्या समस्यांना सामोरा जात आहे.
आदिवासी समुदायाच्या मानवी अधिकाराचे संरक्षण व्हावे, संस्कृतीचे रक्षण करणे, त्यांचा जल-जंगल आणि जमिनीवरील अधिकार अबाधित राहावा, त्यांची विशिष्ट संस्कृती, ओळख, हक्क आणि अधिकाराची ओळख, सामाजिक ऐक्य, अस्तित्व, स्वाभिमान, आत्मसन्मान, अस्मिता, कायम राहावी यासाठी व्यापक जनजागृती आणि प्रयत्नांची आवश्यकता लक्षात घेऊन संयुक्त राष्ट्र संघाकडून हा दिवस दरवर्षी 'जागतिक आदिवासी दिन' म्हणून साजरा केला जातो.
मुख्य प्रवाहाकडे आदिवासींची वाटचाल
जंगलात राहणारा वस्त्रशून्य किंवा अर्धवस्त्र समाज म्हणजे आदिवासी समाज अशी एकेकाळी आदिवासी समाजाची ओळख होती. मात्र. आता आदिवसींनीही आपली वाट बदलून मुख्य प्रवाहाची वाट धरली आहे. या समाजातून शिक्षित आणि स्पर्धा परीक्षांमध्ये नैपूण्य दाखविणाऱ्यांचा टक्कादेखील वाढला आहे. वर्तमानातून उज्ज्वल भविष्याकडे आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात जाताना आपल्या गौरवशाली परंपरांचे जतन करणारा आदिवासी समाज अशी एक नवी ओळख निर्माण झालेली आहे.
महत्वाच्या बातम्या :