9th August 2022 Important Events : 9 ऑगस्ट दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना
9th August 2022 Important Events : ऑगस्ट महिन्यातील 9 तारखेचं महत्त्व नेमकं काय आहे ते जाणून घ्या.
9th August 2022 Important Events : ऑगस्ट महिना सुरु झाला आहे. याचबरोबर श्रावण महिन्यालाही सुरुवात झाली आहे. आज 9 ऑगस्ट म्हणजेच ऑगस्ट क्रांती दिन आहे. भारताच्या इतिहासात 9 ऑगस्ट हा दिवस ऑगस्ट क्रांती दिवस म्हणून ओळखला जातो. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक लहान-मोठ्या चळवळी झाल्या. ब्रिटीशांना भारतातून हाकलून देण्यासाठी महात्मा गांधींनी आपले शेवटचे स्वातंत्र्य युद्ध भारत छोडो चले जावं आंदोलनाच्या रूपात लढण्याची घोषणा केली होती. जी आज ऑगस्ट क्रांती म्हणून ओळखली जाते. या व्यतिरिक्त आणखी कोणते महत्वाचे दिवस आहेत हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात 9 ऑगस्ट दिनविशेष.
1890 : गायक आणि नट केशवराव भोसले यांचा जन्म
केशवराव भोसले यांनी वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी स्वदेश हितचिंतक नाटक मंडळीत प्रवेश घेतला. त्यांचा जन्म 9 ऑगस्ट 1890 रोजी झाला. संगीत शारदा या नाटकातील मूर्तिमंत भीती उभी ह्या पदाने त्यांना प्रसिद्धी दिली. वयाच्या 18 व्या वर्षी त्यांनी सिद्धारूढ स्वामींच्या आशीर्वादाने हुबळीमध्ये ललितकलादर्श नाटक मंडळी स्थापन केली.
संगीतसूर्य केशवराव भोसले मराठी रंगभूमीवरील एक सुप्रसिद्ध संगीतगायक नट होते. स्त्री भूमिका करणारे, दिग्दर्शक , निर्माते अशी त्यांची ओळख होती. 1921 सालची संगीत शाह शिवाजी नाटकातील शिवाजी महाराजांची भूमिका ही त्यांच्या आयुष्यातील शेवटची भूमिका होती. केशवराव फक्त 31 वर्ष जगले. केशवराव भोसले यांचे 4 ऑक्टोबर 1921 रोजी निधन झाले.
1975 : भारतीय अभिनेते आणि निर्माते महेश बाबू यांचा जन्म
महेश बाबू हा एक तेलुगू अभिनेता आहे. त्याचा जन्म 9 ऑगस्ट 1975 रोजी तामिळनाडू येथे झाला. त्याने आपल्या चित्रपट कारकिर्दीला बालपणात सुरुवात केली. त्याचा 2003 चा ब्लॉकबस्टर चित्रपट ओक्कडू हा त्या काळातील सर्वात मोठ्या तेलगू चित्रपटांपैकी एक होता. 2005 मध्ये आलेला त्याचा अथाडू हा तेलगू सिनेमातील आणखी एक उच्च कमाई करणारा चित्रपट होता ज्याने आंतरराष्ट्रीय मान्यता मिळवली.
1991 : अभिनेत्री आणि मॉडेल हंसिका मोटवानीचा जन्म
हंसिका मोटवानी ही एक भारतीय अभिनेत्री आहे. ती प्रामुख्याने तमिळ आणि तेलुगु चित्रपटांमध्ये काम करते.
1909 : कन्नड साहित्यिक, शिक्षणतज्ञ व इंग्रजी वाङ्मयाचे गाढे अभ्यासक डॉ. विनायक कृष्ण गोकाक यांचा जान्म
1776 : ऍव्होगॅड्रो - इटालियन रसायनशास्त्रज्ञ यांचा जन्म
1754 : पिअर चार्ल्स एल्फांट - वॉशिंग्टन शहराचे रचनाकार फ्रेन्च-अमेरिकन वास्तुविशारद आणि स्थापत्य अभियंते यांचा जन्म
2015 : भारतीय पत्रकार, लेखक, आणि कवी कायर किन्हाण्णा राय यांचे निधन
2002 : सामाजिक कार्यकर्त्या शांताबाई दाणी यांचे निधन
1996 : जेट इंजिन विकसित करणारे फ्रँक व्हाईट यांचे निधन
1976 : ऊर्दू शायर व गीतकार जान निसार अख्तर यांचे निधन
1948 : हुगो बॉस कंपनीचे संस्थापक हुगो बॉस यांचे निधन
1901 : मराठी रंगभुमीचे जनक विष्णूदास अमृत भावे यांचे निधन
महत्वाच्या घटना
1965 : मलेशियातुन बाहेर काढल्यामुळे सिंगापूर हा देश स्वतंत्र झाला. आपल्या इच्छेविरुद्ध स्वतंत्र झालेला हा जगातील एकमेव देश आहे.
1945 : अमेरिकेने दुसरा अणुबाँब जपानच्या नागासाकी या शहरावर टाकला.
1925 : चंद्रशेखर आझाद आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी काकोरी रेल्वेस्थानकावर सरकारी खजिना लुटला.
1892 : थॉमस एडिसन यांना दुहेरी तार यंत्राचे पटेंट मिळाले.
1173 : पिसाच्या झुलत्या मनोऱ्याचे बांधकाम सुरू झाले. हा मनोरा बांधण्यास दोनशे वर्षे लागली आणि चुकीने तो तिरका बांधला गेला.