World Snake Day 2023 : 'जागतिक सर्प दिन' नेमका का साजरा केला जातो? जाणून घ्या या दिनाचं महत्त्व
World Snake Day 2023 : सापांविषयी लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी आणि त्यांच्याबद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी 'जागतिक सर्प दिन' साजरा केला जातो.
World Snake Day 2023 : जगात असे बरेच दिवस असतात जे साजरे केले जातात, परंतु काही दिवस अनोखे देखील दिसतात. असाच एक दिवस म्हणजे 'जागतिक सर्प दिन' (World Snake Day) सापांविषयी लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी आणि त्यांच्याबद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी हा दिवस जगभरात साजरा केला जातो. साप हा अशा प्राण्यांपैकी एक आहे ज्याबद्दल जगात बहुधा जास्त गैरसमज आहेत. लोकांना सापांच्या प्रजातींची माहिती देण्याची संधी म्हणूनही हा दिवस साजरा केला जातो.
सापांच्या विविध सुमारे 36 प्रजाती आहेत. यामध्ये नाग, घोमस, मण्यार, फुरसे, धामण, दिवड, नानेती, कवड्या, तस्कर, गवत्या यांचा समावेश आहे.
भारतात पुजले जाणारे साप
भारतात काही ठिकाणी सापांना देव मानलं जातं आणि त्यांची पूजाही केली जाते. मात्र, भारतासह जगात सापांबाबत अनेक गैरसमज आहेत. हे अतिशय महत्त्वाचे प्राणी आहेत आणि पर्यावरणासाठी त्यांना खूप महत्त्व आहे. पण लोकांना सापाची जास्त भीती वाटते. सापाबद्दल अनेक दंतकथाही बनवल्या गेल्या आहेत.
जगाच्या कानाकोपऱ्यातील साप
साप हा जगातील सर्वात प्राचीन प्राण्यांपैकी एक मानला जातो. जगातील जवळजवळ प्रत्येक प्रांतामध्ये, शहरांमध्ये त्याचा उल्लेख आढळतो. आज जगात सापांच्या सुमारे 3458 प्रजाती आहेत. उत्तर कॅनडाच्या बर्फाळ टुंड्रापासून ऍमेझॉनच्या हिरव्या जंगलांपर्यंत प्रत्येक वाळवंटात आणि महासागरात साप आढळतात.
शेतातील साप
फार कमी लोकांना माहित आहे की, शेतात साप शोधणे चांगले लक्षण मानले जाते. साप शेतातील किटक खातात जे पिकांचे नुकसान करतात. याशिवाय, पिकांची नासाडी करणारे उंदीरही साप खातात. आपल्या पिकांचं, धान्याचं रक्षण व्हावं यासाठी जगातील अनेक शेतकरी साप पाळतात.
हा साप कुतूहल निर्माण करतो
कुतूहल निर्माण करणारा हा प्राणी आहे. साप दिसायला अतिशय आकर्षक असतात तितकंच काही सापांचं सौंदर्य भयावह असतं. सापांचे पूर्वज हे डायनासोर, सरपटणारे प्राणी यांचेही पूर्वज आहेत हे फार कमी लोकांना माहीत आहे. जगात कमी पण तरीही लोक सापांना पाळीव प्राणी म्हणून पाळतात. सहसा भारतासारख्या देशात सापांची खूप भीती असते. साप चावतील या भीतीने त्यांची हत्याही केली जाते. पण, आता परिस्थिती बदलत चालली आहे. सापांचं संरक्षण करणारे, त्यांची देखभाल करणारे अनेक सर्प मित्रही आपल्याला पाहायला मिळतात.
महत्त्वाच्या बातम्या :