World Ozone Day 2023 : आज 'जागतिक ओझोन दिन', पर्यावरणासाठी महत्त्वाचा दिवस; वाचा या दिनाचा इतिहास आणि महत्त्व
World Ozone Day 2023 : जागतिक ओझोन दिवस साजरा करण्यामागील संकल्पना केवळ लोकांना ओझोनच्या थराविषयी जागरूक करणे आणि खराब झालेल्या ओझोन थराची जाणीव करून देणे आहे.
World Ozone Day 2023 : ओझोन दिन (ozone day) हा पर्यावरणासाठी एक अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. लोकांना ओझोनच्या थराचे जतन करण्यासाठी शक्य ते उपाय शोधण्यासाठी ‘जागतिक ओझोन दिन’ दरवर्षी 16 सप्टेंबरला साजरा केला जातो. वातावरणातील ओझोनचे सुरक्षा कवच राखून ठेवण्यासाठी हा दिवस लक्षवेधी ठरतो.
दरवर्षी 16 सप्टेंबर रोजी जागतिक ओझोन दिन (ozone day) साजरा केला जातो. ओझोन थराबद्दल (ozone layer) लोकांमध्ये जागरूकता पसरवण्यासाठी आणि ते टिकवण्यासाठी संभाव्य उपाय शोधण्यासाठी हा उपाय साजरा केला जातो. ओझोन हा ऑक्सिजन वायूच्या 3 अणूंचं संयुग आहे. जो वातावरणात अगदी कमी प्रमाणात आढळतो. ओझोन थर हा ऑक्सिजन इतकाच महत्त्वाचा आहे. कारण त्यामुळेच पृथ्वीचे रक्षण होत असते. ओझोन थर सूर्यापासून उद्भवणार्या हानिकारक अल्ट्रा व्हायलेट किरणांपासून (The rays of the sun) पृथ्वीचे (Earth) रक्षण करते. सूर्यापासून निघणाऱ्या या किरणांमुळे त्वचेचे अनेक आजार उद्भवू शकतात.
19 डिसेंबर 1994 रोजी जागतिक ओझोन दिनाची झाली घोषणा
जागतिक ओझोन दिवस साजरा करण्यामागील संकल्पना केवळ लोकांना ओझोनच्या थराविषयी जागरूक करणे आणि खराब झालेल्या ओझोन थराची जाणीव करून देणे आहे. जर लोकांनी प्रदूषण कमी केले तर ओझोन थराला नुकसान होण्यापासून वाचवता येईल. 19 डिसेंबर 1964 रोजी संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेने ओझोन थराच्या संरक्षणासाठी 16 सप्टेंबर हा जागतिक ओझोन दिवस म्हणून घोषित केला. जागतिक ओझोन दिन 1964 पासून दरवर्षी साजरा केला जातो.
ओझोन थर म्हणजे काय?
ओझोनचा थर पृथ्वीचे आणि तिच्यावरील सर्व सजीवांचे हानिकारक किरणांपासून संरक्षण करते. दिवसेंदिवस वाढणारे प्रदूषण आणि वृक्षतोड यामुळे पृथ्वीच्या वायुमंडलातील हा थर डॅमेज होत आहे. जी संपूर्ण जगासाठी धोक्याची घंटा आहे. सूर्याच्या हानिकारक किरणांमुळे अनेक रोग आणि समस्या उद्भवू शकतात, ज्याला फक्त ओझोन थरच थांबवू शकतो.
ओझोन थराचे संरक्षण करणे फार महत्वाचे?
ओझोन थर सूर्याच्या हानिकारक अतिनील किरणांपासून आपले रक्षण करतो आणि वातावरणात संतुलन राखतो. परंतु मानवनिर्मित प्रदूषणामुळे ओझोनचा थर दिवसेंदिवस कमी होत आहे. जो पर्यावरणाला विनाशकारी ठरू शकतो. जर सूर्यावरील अल्ट्रा व्हायलेट किरण थेट पृथ्वीवर पडले तर मानवाशिवाय झाडे आणि प्राणी आणि इतर जीव यांच्यावर याचा अत्यंत धोकादायक आणि प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. अशा परिस्थितीत ओझोन थरचे जतन करणे फार महत्वाचे आहे.
महत्त्वाच्या बातम्या :